धुळेकरांनो.. पुढील काही दिवस राहा सावधान अन् सुरक्षित स्थळी

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे आवाहन
धुळेकरांनो.. पुढील काही दिवस राहा सावधान अन् सुरक्षित स्थळी

धुळे, Dhule (प्रतिनिधी) :

अरबी समुद्रात Arabian Sea लक्षद्वीपमध्ये Lakshadweep येत्या 24 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची शक्यता व बर्‍हाणपूर (मध्य प्रदेश) क्षेत्रात भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department अतिवृष्टी Heavy rain होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 2 डिसेंबर 2021 पर्यंत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह Lightning strikes अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिक, Citizens, शेतकर्‍यांनी farmers सतर्क alert राहात सुरक्षितस्थळी थांबावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा Collector Jalaj Sharma यांनी केले आहे.

जिल्ह्यातील अवकाळी पाऊस व जळगाव जिल्ह्यात तापी नदीमधील पाण्याच्या पातळीत वाढ होवून हातनूर धरणाच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेतकरी व नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल, तर अशा शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. अवकाळी पावसादरम्यान विजा, गारा व अतिवृष्टीपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. प्रसंगी मोकळे मैदान, झाडाखाली, वीजवाहिनी अथवा ट्रान्फॉटीर्मर जवळ थांबू नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com