भाजीपाला विक्रेत्याकडे घरफोडी करणार्‍या दोंघांना बेड्या

64 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी
भाजीपाला विक्रेत्याकडे घरफोडी करणार्‍या दोंघांना बेड्या

धुळे - प्रतिनिधी dhule

शहरातील संताजी नगरात भाजीपाला विक्रेत्याचे घरफोडून टीव्हीसह रोकड, दागिने चोरणारे दोंघांना चाळीसगाव रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरु आहे. दोघांकडून एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संताजी नगरातील हॉटेल चंडीकाच्या पाठीमागे राहणारे भाजीपाला विक्रेते रविंद्र बापुराव चौधरी (वय ४२) यांच्याकडे चोरट्यांनी घरफोडी केली होती. घरातुन ४० इंची टीव्ही, १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि १० हजाराची रोकड असा एकूण २४ हजाराचा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात भादंवि ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनि संदीप पाटील यांना सदरची घरफोडी इम्रान चाट्या आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आधारे उपनिरीक्षक नितीन पाटील व शोध पथकातील कर्मचार्‍यांनी अंबिका नगर भागातून इम्रान शेख रफिक याला ताब्यात घेतले.त्याला बोलते केले असता त्याने त्याचा साथीदार हेमंत किरण मराठे (वय २६ रा.वाहन मालक सोसायटी, हॉटेल डीडीआरसी मागे, धुळे) व अन्य एका साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याचे कबुली दिली. पोलिसांनी हेमंत मराठेलाही ताब्यात घेतले.

दोघांकडून ४० इंची टिव्ही,१० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, २५०० रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल असा एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाआहे. पोलीस फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. इम्रानवर चाळीसगाव रोड पोलिसातच घरफोडीशिवाय आणखी दोन गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप पाटील, पीएसआय नितिन चौधरी,हे.कॉ.पंकज चव्हाण, पोना एस.जी.कढरे, बाळासाहेब डोईफोडे,हेमंत पवार,स्वप्नील सोनवणे, चेतन झोलेकर, इंद्रजीत वैराट, प्रशांत पाटील यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com