धुळ्यातील तापमानाचा पारा 2.8 अंशावर

धुळ्यातील तापमानाचा पारा 2.8 अंशावर

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

धुळ्यातील तापमानाचा (temperature) पारा (temperature) 2.8 अंशावर घसरला असून हाडे गोठविणारी थंडीचा (Cold) अनुभव धुळेकरांनी घेतला. 29 डिसेंबर 2018 ला धुळ्याचे तापमान 2.2 अंशावर घसरले होते. तापमानात घट झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील तापमानाचा पारा गेल्या तीन दिवसापासून खाली आला आहे. 26 जानेवारी रोजी 3 अंश तापमानाची नोंद कृषी महाविद्यालयात करण्यात आली होती. तर आज दि.27 जानेवारी रोजी 2 अंशाने घट होवून तापमान 2.8 अंशावर घसरले. राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद आज झाली आहे.

तापमान घसरल्यामुळे कांदा, हरभरा व अन्य रब्बी पिके धोक्यात आली आहेत. तसेच तापमानाने निचांक गाठल्यामुळे व्हायरल फ्ल्युची साथ पसरली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com