सुरत येथे ट्रक मधून पोहोच केली जाणारी २५ लाखांची रोकड जप्त

धुळे तालुका पोलिसांची कारवाई
सुरत येथे ट्रक मधून पोहोच केली जाणारी २५ लाखांची रोकड जप्त

धुळे - प्रतिनिधी dhule

तालुक्यातील कुसुंबा (Kusumba) शिवारात (Highway) महामार्गावर सापळा रचून तालुका (police) पोलिसांनी एका ट्रकमधून २५ लाखांची रोकड जप्त केली. ही रक्कम मालेगाव (Malegaon) येथून (surat) सुरत येथे पोहोच केली जाणार होती. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी आयकर विभागाशी पत्रव्यवहार सुरु केला आहे. कुसुंबामार्गे सुरतकडे जाणाऱ्या ट्रकमधून (क्र.एम.एच.१७ ए.जी.०५९२) चालक मोठ्या प्रमाणात रोकड घेवून जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पाटील यांनी रात्र गस्तीच्या कर्मचार्‍यांना कुसुंबा उड्डाणपुलाखाली सापळा रचायला सांगीतला. पथकाने सापळा रचत पहाटे एक वाजेच्या सुमारास त्या ट्रकला थांबविले. चालकाने त्याचे नाव शेख शफीक शेख अहमद (वय ५७ रा.गुलशेर नगर,मालेगाव) असे सांगीतले. ट्रकच्या कॅबिनची झडती घेतली असता त्यात एका सफेद रंगाच्या प्लास्टीकचे बंडल आढळून आले.

प्लास्टीकच्या बंडलमध्ये काय आहे, अशी विचारणा केली असता त्याने रोकड असल्याचे सांगितले. मालेगावच्या विजयभाई बाबुभाई पटेल याने ही रक्कम दिली असून ती सुरतला देणार असल्याचे सांगितले. मात्र या रक्कमेबद्दल ट्रक चालक जास्त माहिती देवू न शकल्याने ही रक्कम हवाल्याची असल्याचा पोलिसांना संशय आहे. पुढील कारवाईसाठी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोहेकॉ. प्रविण पाटील, पोना प्रमोद ईशी, नंदु चव्हाण, पोकॉ.प्रकाश भावसार, कुणाल शिंगाणे, राकेश मोरे, कांतीलाल शिरसाठ,रविंद्र राजपुत, निलेश पाटील यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com