धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांची बदली

संजय बारकुंड पदभार स्वीकारणार
धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांची बदली

मुंबई/धुळे । dhule

राज्यातील 24 आयपीएस (IPS Officers in the State) अधिकार्‍यांच्या बदल्या (transfers) करण्यात आल्या असून धुळ्याचे पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (Dhule Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागेवर (replacement) नाशिक येथून संजय बारकुंड (Nashik Sanjay Barkund) यांची नियुक्ती (appointment) करण्यात आली आहे. प्रवीणकुमार पाटील यांना अद्याप ठिकाण देण्यात आलेले नाही.

राज्यातील 24 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये सारंग आव्हाड यांची पोलीस अधीक्षक बुलडाणा, निलोत्पल यांची पोलीस अधीक्षक गडचिरोली, संजय बारकुंड यांची पोलीस अधीक्षक धुळे तर एम.राजकुमार यांची जळगाव पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांना अद्याप नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. त्यांचा स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, असे गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com