धुळ्यात चाकुचा धाक दाखवून तरुणीला लुटले

धुळ्यात चाकुचा धाक दाखवून तरुणीला लुटले

धुळे । प्रतिनिधी ः dhule

शहरातील पांझरा नदी काठी असलेल्या गणपती मंदिराजवळून जाणार्‍या तरुणीला एकाने चाकूचा धाक दाखवून लुटले.

दरम्यान भरवस्ती लगत घडलेल्या या घटनेमुळे तरुणींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेे.

शहरातील साक्रीरोडवरील मोगलाई परिसरात राहणारी २० वर्षीय तरुणी एका खाजगी डेंन्टल हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. ती ड्युटी संपवून आणि महिन्याचा पगार ७ हजार रुपये घेेवून रात्री ९ वाजेच्या सुमारास घराकडे निघाली होती. सोबत तिचे वडीलही होते.

सिध्देश्‍वर गणपती मंदिराजवळून चढण रस्ता दग्याकडे आणि जगदीशनगरकडे जातो. तेथील दिवे ही काल बंद होते. याचाच गैरफायदा एका तरुणाने घेतला. तरुणी चढण रस्ता चढत असताना तिचे वडील तिच्यापासून काही फुट अंतरावर होते. एक तरुण अचानक तिच्यासमोर आला. त्याने तिच्या मानेला चाकू लावत तिच्याकडील पर्स आणि मोबाईल हिसकावला. तिने आरडाओरड सुरु करताच तिचे वडील धावुन आले. मात्र तो झुडूपांचा फायदा घेत पसार झाला. त्यानंतर तरुणीने पोलिस स्टेशन गाठले. घटेनची माहिती माजी नगरसेवक संजय वाल्हे यांना कळताच ते स्वतः पोलिस स्टेशनला गेले. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com