धुळे प्रांत, आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयाला ‘आयएससो’ मानांकन

धुळे प्रांत, आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयाला ‘आयएससो’ मानांकन

धुळे Dhule। प्रतिनिधी

धुळे उपविभागीय कार्यालयासह (Dhule Sub Divisional Office) आदिवासी विकास प्रकल्प (Tribal Development Project) या दोन्ही कार्यालयांना आयएससो मानांकन (ISO rating) मिळाले असून हे मानांकन घेणारे उपविभागीय कार्यालय धुळे हे नाशिक विभागातील पहिलेच महसूली कार्यालय ठरले आहे.

धुळे उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडेच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा प्रकल्प अधिकारी पदाचा कारभार असून दोन्ही कार्यालयांना आयसो मानांकन मिळविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न फलदायी ठरले आहे. उपविभागीय कार्यालय धुळे हे जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असून जुन्या इमारतीलाच नवी झळाळी प्राप्त झाली आहे. धुळे उपविभागीय कार्यालयासह आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात भौतिक सुविधांसह आवश्यक बाबींची पुर्तता या निमित्ताने पहायला मिळत आहे.

धुळे उपविभागीय कार्यालयाच्या आवारात आर्कषक झाडांसह स्वच्छता दिसत असून प्रेरणादायी सुविचार मन वेधून घेत आहे. सोबत इमारतीच्या दर्शनी भागात नकाणे तलाव, अक्कलपाडा धरण, सौरउर्जा प्रकल्प साक्री, लळींग किल्ला यांचे आकर्षक चित्र रेखाटण्यात आले आहे.

कार्यालयाच्या आवारात भारतीय संविधानाची उद्देशिकेसह कार्यालयाच्या भिंती बोलक्या करण्यात आलेल्या आहे. याचबरोबर इमारतीतील जूने नष्ट करण्याजोगे असलेल्या खालीत उपविभागीय अधिकारी यांचे न्यायालय नव्या रुपात सजले असून विविध विषया संदर्भातील खटले, तक्रारी निवारणासाठी 500 स्के. फूट असलेली अर्धन्यायीक कक्षाची उभारणी करण्यात आली आहे.

अभिलेखांचे सुस्थितीत असन्या बरोबरच त्यांचे जतन करण्यासाठी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून कार्यालयाच्या कर्मचारी वर्गाच्या सहकर्याने क्युअर कोड हे तंत्रज्ञान वापरून प्रत्येक संचिका आद्यावत केल्याने कुठलीही नस्ती शोधणे आता एका क्लिक वर शक्य झाले आहे. तसेच सहा गठ्ठा कार्य पद्धतीने प्रशासन गतीमान होण्यास मदत झाली आहे.

उपविभागीय कार्यालयासह आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सर्व सोईसुविधा उपलब्ध झालेल्या असून नवीन प्रसाधन गृह, प्रथम उपचार पेटी, बायोमॅट्रीक प्रणाली, अग्नीशमन यंत्र, तक्रार पेटी, कर्मचार्‍यांना ड्रेस कोड, तसेच संगणकीय सुविधा, कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र वाचन सुविधा उपलब्ध झाले आहे.

दोन्ही कार्यालय मिळून 5-6 टन कागद नष्ट करण्याजोगे निघाला आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील विविध लोकाभिमुख शासकीय योजनासह विविध फाईल यांना क्यू आर कोड देवून अद्यावत करण्या बरोबरच अभिलेख कक्षाची रचना सुटसुटीत करण्यात आली आहे. तसेच या कार्यालयात 650 स्के. फुट मोकळ्या आकाराचा बैठक हॉल उभारण्यात आला असल्याने कार्यालयात येणार्‍या प्रत्येकाची सोय झाली आहे.

उपविभागीय कार्यालयासह आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मेहनेतीने आयसो मानांकन मिळणे सोपे झाले असून दोन्ही कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाने हे शक्य झाले आहे. अशी भावना दोन्ही कार्यालयातील सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी व्यक्त केली.

आत्ता पर्यंत एकाच वेळी उपविभागीय कार्यालय व आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया आयसो मानांकनाने गौरविले गेल्याने धुळे जिल्ह्यात मानाचा तूरा रोवला गेला आहे.

क्यूआर कोड पद्धत ही सर्वात नाविन्यपूर्ण

आयसो परिक्षणासाठी आलेल्या अधिकार्‍यांनी कार्यालयातील अभीलेखास क्यूआर कोड पद्धतीने संचिका माहिती संकलीत केल्याचे प्रथमच अढळून आले आहे, असे अभिनंदन पर उद्गार काढले. आजपर्यंतच्या तपासणीत सदर क्यूआर कोड पद्धत ही सर्वात नाविन्यपूर्ण आढळून आल्याचे सांगीतले व कौतुकाची थाप दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com