धुळे महापौर आरक्षण सर्वसाधारण खुले

हालचालींना येणार वेग, इच्छूकांची मार्चेबांधणी सुरु
धुळे महापालिका
धुळे महापालिका

धुळे । Dhule । प्रतिनिधी

धुळे महापालिकेच्या (Dhule Municipal Corporation) महापौर पदासाठीचे (post of mayor) आरक्षण (Reservations) आता खुले प्रवर्गातील (Open categories) निघाले आहे. मुंबईत आज यासाठी सोडत काढण्यात आली.

महापालिकेच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्या अभिप्रायानुसार महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. खुले, सर्वसाधारण आरक्षण महापौर पदासाठी निघाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर दिलेल्या निर्णयानुसार प्रदीप कर्पे यांना महापौर पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता या पदासाठी सोडत काढण्यात आली.

महापौर पदाचे आरक्षण सोडत निघाल्यामुळे आता हालचालींना वेग येणार आहे. महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आहे. बहुमताच्या जोरावर गेली अडीच वर्ष भाजपने मनपाची धुरा सांभाळली असतांना पुन्हा महापौर निवडीसाठी मतदान होण्याची शक्यता नाही. कारण भाजपा विरोधकांकडे अपेक्षीत असणारे संख्याबळ नाही.

अर्थात पुन्हा भाजपाचाच महापौर होवून सत्ता भाजपाकडे राहील. यामुळे खुल्या प्रवर्गातील आणि भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेल्या इच्छूकांच्या महत्वकांक्षा वाढून त्यांच्या हालचालींना वेग येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com