धुळ्यातील जवानाची पुलवामात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

धुळ्यातील जवानाची पुलवामात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील देवपूर भागातील आनंद नगर, भोई सोसायटीत राहणार्‍या सीआरपीएफच्या (crpf) जवानाने जम्मू कश्मीर (Jammu ashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथे ऑन ड्युटी स्वतःगोळी झाडून आत्महत्या (suicide) केली.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अधिकार्‍यांच्या त्रासामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय कुटूंबियांनी व्यक्त केला आहे. योगेश अशोक बिर्‍हारे (वय 37 रा. आनंद नगर, भोई सोसायटी, धुळे) असे शहिद जवानाचे नाव आहे. 25 जानेवारी 2006 रोजी ते भारतीय सैन्य दलात भरती झाले.

धुळ्यातील जवानाची पुलवामात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
पतीचे अनैतिक संबंध ; पत्नीची आत्महत्या

त्यांनी छत्तीसगड, मुंबई (तळोजा) त्यानंतर जम्मु कश्मीर, नांदगाव येथे सेवा केली आहे. सध्या ते जम्मु कश्मीरमधील पुलवामा येथे देशसेवा बजावत होते. शहिद जवान योगेश बिर्‍हाडे यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, पाच वर्षाचा मुलगा, एक वर्षाची मुलगी, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. त्याचा मृतदेह आज रात्री धुळ्यात दाखल होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com