अवैधशस्त्र शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोहीम

अवैधशस्त्र शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात मोहीम

एकाकडून पिस्टल जप्त, तिघांवर गुन्हा

धुळे - dhule

जिल्ह्यात अवैधरित्या पिस्टल (Pistol) आणि इतर शस्त्र बाळगणार्‍यांविरुध्द जिल्हा पोलिस दलाने (District Police Force) मोहिम हाती घेतली आहे. आतापर्यंत २३ हुन अधिक शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान (lcb) एलसीबीच्या पथकाने तालुक्यातील मुकटी गावातून एकाला अटक केली असून त्याच्याकडून ३७ हजार रुपये किंमतीची गावठी कट्टा व चार जीवंत काडतुसे जप्त केली आहे. त्याच्यासह त्याला कट्टा विकणाऱ्या दोघांवरही तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Superintendent of Police Pravin Kumar Patil) पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद ही माहिती दिली. एलसीबीच्या पथकाने मुकटी गावात जावून आकाश पवार याच्या घरी काल छापा टाकला.

घराची झडती घेतली असता एक ३३ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व ४ हजार रुपये किंमतीचे ४ जीवंत काडतुसे मिळून आली. ते जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने ही शस्त्र विठ्ठल आत्माराम महाजन (वय २८) (रा.विखरण ता.एरंडोल) व संजय सायमल पावरा (रा.भिलटपााडा,आंबा ता.धुळे) त्यांंच्याकडूनच घेतल्याची कबुली दिली. त्या दोघांचाही एलसीबीच्या पथकाने शोध सुरु केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप याच्या फिर्यादीवरुन आकाश उर्फ दिपक बन्सीलाल पवार (वय २३) व त्याच्या दोन साथीदारांविरुध्द तालुका पोलिसात भारतीय हत्त्यार कायदा कलम ३,५ चे उल्लंघन कलम २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन करीत आहेत.

ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, (Upper Superintendent of Police Prashant Bachhav) अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनी प्रकाश पाटील, पोउनी योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, एएसआय धनंजय मोरे, हवलदार. प्रभाकर बैसाणे,संजय पाटील, संतोष हिरे, पोना पंकज खैरमोडे, पोशि सागर शिर्के, योगेश जगताप, किशोर पाटील, महेंद्र सपकाळ, मयुर पाटील, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com