पिंपळनेर भाजपाचे देवेंद्र गांगुर्डे तर चिकसे गणात पगारे विजयी

पिंपळनेर भाजपाचे देवेंद्र गांगुर्डे तर चिकसे गणात पगारे विजयी

धुळे । Dhule- प्रतिनिधी

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणार्‍या चारही पंचायत समितीच्या पोटनिवडणूकीसाठी जिल्ह्यात शांततेत मतदान झाले. सकाळी ७.३० वाजेपासून ५५२ मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असून जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

पिंपळनेर पंचायत समिती गणात भाजपाचे देवेंद्र मुरलीधर गांगुर्डे तर चिकसे गणात भा.ज.पा.पुरूस्क्रुत अपक्ष सौ.रोशनी बाई शाम पगारे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असुन भाजपाने पिंपळनेर चा गड कायम राखला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या तीनही ठिकाणी कासारे, म्हसदी आणि बळसाने गणात शिवसेनेचा दणदणीत विजय झाला आहे.

मा. आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली मालपुर गटातुन महावीर दादा रावल व खलाणे गटातुन पंकज कदम विजयी, नरडाणा गटातुन संजीवनी सिसोदे विजयी , दाऊळ गणातुन भारत ईशी विजयी झाल्या आहेत.

मालपुर गटात महावीर रावल, खलाणे गटात सौ.सोनी पंकज कदम, मेथी गणात रणजीत गिरासे विजयी झाले आहेत.

Related Stories

No stories found.