
मुंबई । Mumbai
महाआवास अभियान 2020-21 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana)-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम ठरला असून धुळे दुसर्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकांवर सर्वोत्कृष्ट ठरले आहे.
त्याचबरोबर राज्य पुरस्कृत आवास योजनामध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम क्रमांकावर, रत्नागिरी जिल्हा व्दितीय क्रमांक आणि वर्धा जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट जिल्हे ठरले आहेत. गोंदिया जिल्ह्याने सर्वात जास्त उपक्रमामध्ये पुरस्कार पटकावण्याचा मान संपादन केला आहे. राज्यात राबविण्यात आलेल्या महा आवास अभियान 2020-21 चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली आहेत.
राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान 2020-21 राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या अभियानात 5 लाख पेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत.
या अभियानामधे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये उत्कृष्ट काम करणार्या संस्थाना, 10 अभियान उपक्रमांमध्ये अभियान कालावधीत केलेल्या कामाच्या टक्केवारीच्या आधारे एकत्रित गुणांकन करुन पुढीलप्रमाणे महा आवास अभियान पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
सर्वोत्कृष्ट जिल्हे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोंदिया - प्रथम, धुळे - द्वितीय, ठाणे - तृतीय. राज्य पुरस्कृत आवास योजना :- अहमदनगर - प्रथम, रत्नागिरी - द्वितीय, वर्धा - तृतीय.
सर्वोत्कृष्ट तालुके : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण :- गोरेगाव (जि.गोंदिया) - प्रथम, गगनबावडा (जि.कोल्हापूर) - व्दितीय, अकोले (जि.अहमदनगर) - तृतीय. राज्य पुरस्कृत
आवास योजना :- सडक अर्जुनी (जि.गोंदिया) - प्रथम, मुक्ताईनगर (जि.जळगाव)- व्दितीय, कागल (जि.कोल्हापूर) - तृतीय.