
धुळे - Dhule - प्रतिनिधी :
शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या फुलेनगर येथे देशी-विदेशी बनावट दारु तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला.
या ठिकाणाहून लाखो रुपयांची दारु व वाहन जप्त केले.पोलिसांना बनावट दारु कारखानाबाबत गुप्त बातमी मिळाली.
या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी बनावट दारु कारखान्यावर छापा टाकला असता लाखो रुपयांचा विदेशी दारू बनावट साठा जप्त केला.
या ठिकाणाहून महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे. सदर गाडीस दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट लावलेल्या आहेत.