रूमालपाड्यात मुलानेच केली बापाची हत्या

रूमालपाड्यात मुलानेच केली बापाची हत्या

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शिरपूर तालुक्यातील हाडाखेड शिवारातील रूमालपाड्या क्षुल्लक कारणावरून मुलानेच दगडाने ठेवून बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली.

पोलिसांनी संशयीताला अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हमर्‍या दसर्‍या पावरा (रा. रूमालपाडा ता. शिरपूर) असे मयताचे नाव आहे.

ते पत्नी सरादीबाई, मुलगा दादुराम व सुन सुनिताबाईसह गावात राहत होते. दि. 18 मार्च रोजी रात्री पावरा कुटुंबिय अंगणात झोपलले होते.

तेव्हा हमर्‍या पावरा हा दारू पिऊन आला. तेव्हा बॅटरीचा काच कोणी फोडला, असे म्हणत पत्नी सरादीबाईला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. आरडाओरड ऐकुण मुलगा दादुराम व सुन बाहेर आले.

आईला मारहाण करत असल्याचे पाहुन दादुराम याने वडील हमर्‍या यांना मारहाण केली. दोघांचा वाद पाहुन दोन्ही महिला घाबरून पळुन गेल्या.

आज सकाळी सात वाजता हमर्‍या हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. तर जवळ मुलगा दादुराम बसलेला दिसून आला.

याप्रकरणी सरादीबाई हमर्‍या पावरा यांच्या फिर्यादीवरून दादुराम हमर्‍या पावरा विरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सपोनि सुरेश शिरसाठ याच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच दादुराम याला ताब्यात घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com