कर्जापोटी व्यावसायिकाचा छळ

कर्जापोटी व्यावसायिकाचा छळ

धुळे । Dhule

शहरातील अवैध सावकार राजेंद्र बंबचे प्रकरण ताजे असतांनाच कर्जाच्यारक्कमेपोटी व्यावसायीकाचा चांगलाच छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दहापट पैसे देवूनही पुन्हा पैशांची मागणी करीत व्यावसायीकाचे दुकान नावावर करून घेतल्याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत व्यावसायीक निलेश श्रीराम पवार (रा. अनमोल नगर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांनी आर्थिक अडचणीमुळे दोन लाख रूपये कर्ज घेतले होते. या कर्जापोटी त्यांना गणेश रमेश बागूल उर्फ राम बापु (रा.कॉटनमार्केटमागे, अभय कॉलेज रोड, शांतीनगर, धुळे), निलेश पांडूरंग हरळ (रा.रामनगर, अभय कॉलेजजवळ, धुळे) व वाल्मिक हरळ (रा.अभय कॉलेजजवळ, धुळे) या तिघांनी वेळोवेळी धमक्या देवून, शिवीगाळ करत व जिवे मारण्याची धमकी देवून त्यांच्या कडून जास्तीचे व्याज घेवून 7 फेबु्रवारी 2016 ते डिसेंबर 2021 यादरम्यान 21 लाख 57 हजार रूपये घेतले.

तरीही त्यांचे दुकान मनपातून परस्पर नावावर करून घेतले. ते परत देण्यासाठी पुन्हा 11 लाख रुपयांची मागणी करून त्यांना त्रास दिला. त्यानुसार तिघांविरोधात विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डी. बी.उजे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com