रॉयल्टीचे उल्लंघन करणाऱ्यांची तहसीलदारांशी धटिंगशाही ; नऊ जणांवर गुन्हा

रॉयल्टीचे उल्लंघन करणाऱ्यांची तहसीलदारांशी धटिंगशाही ; नऊ जणांवर गुन्हा

धुळे । प्रतिनिधी dhule

शिंदखेडा (shindkheda) तालुक्यातील धांदरणे गावानजीक रॉयल्टीचे उल्लंघन करणार्‍या गौण खनिज वाहतुकदारांनी तहसीलदारांशी धटिंगशाही केली. त्यांना ओढून नेत घेराव घातला.

पकडलेले वाहने ही पळवून नेवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिंदखेडा तहसीलदार सुनिल महादु सैंदाणे (वय 49 रा. प्रोफेसर कॉलनी, शिंदखेडा) यांनी पोलिस ठाण्यात नरडाणा पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार ते त्यांनी बुधवारी सकाळी अकरा ते बारा वाजेदरम्यान धांदरणे गावानजीक शासकीय रॉयल्टी पेक्षा प्रत्यक्ष वाहनात 5 ब्रास अतिरिक्त मुरूम भरून त्याची वाहतूक करून पारीत केलेल्या रॉयल्टीचे उल्लंघन करणार्‍या तीन डंपरला (एमएच 39 एडी 0904, एमएच 39 एडी 8111 व एमएच 48 टी 9336) पकडले. तेव्हा वाहनांवर कायदेशीर कारवाई करून नये म्हणून डंपर वाहनावरील चालक, मालक तसेच मुरूम वाहतुकदार, लोटन देविदास देसले (रा. माळीच ता. शिंदखेडा) व लोटन देविदास देसले व त्यांच्यासोबत इतर चार जणांनी पथकाशी शाब्दीक वाद घातला. तहसीलदार सैंदाणे यांच्याशी अरेरावी करत त्यांना अपशब्द वापरून धटींगशाही केली. तसेच त्याचा हात धरून रस्त्याच्या कडेला ओढून नेले.

तर लोटन देसले याच्या सोबतच्या चार इसमांनी तहसीलदारांना घेराव घालून वाहनाकडे जाण्यास मज्जाव करून वाहने पळवून नेवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यावरून वरील नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com