धुळे : मुख्यकार्यकारी अधिकारीपदी भुवनेस्वरी एस.

जिल्हा परिषदेच्या वान्मती सी यांची मुंबईत बदली
धुळे : मुख्यकार्यकारी अधिकारीपदी भुवनेस्वरी एस.

धुळे । Dhule । प्रतिनिधी

धुळे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) वान्मती सी (Vanmati c) यांच्या स्टेट कॉमन एन्ट्रन्स एक्झाम सेलच्या (State Common Entrance Exam Cell) कमिशनर (Commissioner) म्हणून मुंबईत बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नागपूर (Nagpur) येथून श्रीमती भुवनेस्वरी (Bhuvaneswari S) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील काही भारतीय प्रशासन सेवेतील (Indian Administrative Service) (आयएएस) अधिकार्‍यांच्या आज बदल्या झाल्यात. यात धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी (Vanmati c) यांचाही समावेश असून त्यांची मुंबईत बदली झाली आहे. वान्मती सी यांनी जिल्हा परिषदेत दोन वर्षाहून अधिक कालावधीत सेवा बजावली. त्यांच्या कारभारामुळे काही वेळेस वादाची परिस्थिती निर्माण झाली. तर सभागृहातही काही सदस्यांना त्यांच्या कामकाजाबद्दल अनेकदा रोष (Often angry about work) व्यक्त केला.

सन 2015 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी भुवनेस्वरी (Bhuvaneswari S) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या नागपूरहून बदली होवून येत असून त्यांनी नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सीटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

भुवनेस्वरी एस. यांच्या धुळे बदलीमुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर महिला राज आल्याची चर्चा होते आहे.

Related Stories

No stories found.