इंधन दरवाढीचा फटका तरीही थाळनेर परिसरात शेतकरी मशागतीत व्यस्त

इंधन दरवाढीचा फटका तरीही थाळनेर परिसरात शेतकरी मशागतीत व्यस्त

थाळनेर Thalner । वार्ताहर

शिरपूर तालुक्यातील थाळनेरसह परिसरात शेतकरी (farmers) खरीपपूर्ण (Kharif) हंगामाच्या तयारीत (preparation for the season) व्यस्त दिसून येत आहे. रणरणत्या उन्हाचे चटके सहन करत शेती मशागतीचे काम आटोपण्यासाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. बहुतेक शेतकरी आता ट्रॅक्ट्ररच्या (tractor) सहाय्याने शेती तयार करत असल्याने ट्रॅक्टरला लागणारे इंधनाचे भाव (fuel price hike) वाढल्याने त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकर्‍यांना शेतीकरणे ही अवघड झाले आहे.

उन्हाच्या तीव्रतेत (intensity of the sun) मोठी वाढ झाल्याने शेतकरी, शेतमजूर सकाळपासूनच शेतातील कामे (Farm work) करण्यासाठी जात आहेत. तर दुपारी लवकर घरी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी काही शेतकरी घरच्याघरी शेतीची कामे करीत आहेत. तर मोठे बागायतदार शेतकरी मजुरांकडून कामे करून घेत आहेत. बहुतेक शेतकर्‍यांच्या आता बैलजोडी ऐवजी ट्रॅक्टरच्या (Tractor) साहाय्याने शेती तयार करण्याच्या कल वाढलेला आहे. .

ट्रॅक्टरमुळे मशागत चांगली होते. वेळही वाचतो. यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी शेतात राबत आहे. त्यात शेतीची नांगरटी करणे, रोटव्हेटर करणे, वखरने, जाळ्या तोडणे, काडी कचरा वेचून जाळणे, शेणखत टाकणे, जमिनीची सपाटीकरण करणे, शेतात पावसाळ्याचे पाणी कसे शेतातच मुरले जाईल, यासाठी बांधबधीस्त करणे.

शेतात उत्पन्न कसे वाढवून घेता येईल, याबाबत शेतकरी नियोजन करून भर उन्हात शेतात कामे करण्यात व्यस्त दिसून येत आहे. यावर्षी हवामान खात्याने पावसाचे आगमन (arrival of rain) लवकर होण्याचे संकेत दिल्याने शेतातील राहिलेले काम लवकर उरकण्यावर शेतकर्‍यांनी भर दिला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com