उपायुक्त गणेश गिरी कोरोना पॉझिटीव्ह

उपायुक्त गणेश गिरी कोरोना पॉझिटीव्ह

धुळे Dhule । प्रतिनिधी

महापालिकेचे (Municipal Corporation) उपायुक्त (Deputy Commissioner) गणेश गिरी (Ganesh Giri) हे कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) असून त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरु आहेत. सध्या ते विलगीकरणात आहेत. अशी माहिती महापालिका प्रशासनाने पोलीस यंत्रणेला दिली आहे.

लसीकरण बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवसेनेने उपायुक्त गिरी यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. मोरे यांनी गिरी यांच्या आदेशाने लसीकरणाचे काम व्हायचे असा जबाब दिला आहे.

त्यामुळे पोलिसांनी गिरी यांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना दिली आहे. परंतू गिरी हे कोरोना पॉझिटीव्ह असून त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरु आहेत. ते विलगीकरणात आहेत. बरे झाल्यानंतर चौकशीसाठी उपस्थित राहतील असे महापालिका प्रशासनाने शहर पोलिसांना कळविले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com