शारिरीक संबंध ठेवून लग्नास नकार, बदनामी केल्याने तरूणीची आत्महत्या

शारिरीक संबंध ठेवून लग्नास नकार, बदनामी केल्याने तरूणीची आत्महत्या

धुळे । प्रतिनिधी dhule

लग्नाचे (marriage) आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून नंतर लग्नास नकार दिला. त्यामुळे बदनामी होवून तरूणीने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुरझड येथील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मयत पिडीत तरूणीच्या आईने सोनगीर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्या 19 वर्षीय मुलीला नितीन राजेंद्र पाटील याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध केले. तसेच नितीसह मच्छींद्र खंडु पाटील, गणेश राजेंद्र पाटील, ज्ञानेश्‍वर, शोभा राजेंद्र पाटील सर्व (रा.बुरझड) यांनी तिची बदनामी केली. त्यामुळे पिडीत तरूणीने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली, पुढील तपास पीएसआय रविंद्र महाले करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com