शेतकरी व व्यापार्‍यांचे बाजार समितीत निदर्शने

गुरे विक्रेत्यांना त्रास, शेतकर्‍यांना संरक्षण देण्याची मागणी, अन्यत्र गुरे बाजार भरविणार
शेतकरी व व्यापार्‍यांचे बाजार समितीत निदर्शने

धुळे Dhule । प्रतिनिधी

आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी, (Farmers,) पशुपालक (Pastoralist) आपली गुरे बाजार (Cattle market) समितीत विक्रीसाठी (For sale) आणतात परंतू त्यांना काहीजण त्रास (Trouble) देतात. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांनी आज बाजार समितीत निदर्शने (Demonstrations) केली. धुळे मार्केट कमिटीत (Dhule Market Committee) गुरे व्यापार बंद करुन वरखेडी रोड भागात गुरे खरदी-विक्रीचा व्यापार सुरु केला जाईल. असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे.

आज मंगळवारचा दिवस असल्याने धुळे बाजार समितीत गुरांचा बाजार भरला होता. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी त्यांची गुरे विक्रीसाठी आणली होती. परंतू काही जणांनी त्यांना त्रास व दमदाटी केली. नेहमी होणार्‍या त्रासामुळे शेतकरी संतप्त झाले व त्यांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला.

मार्केट कमिटीत गुरे विक्रीसाठी आणणार्‍या आणि खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांकडून बाजार समितीत फी वसुल करते. मात्र मार्केटच्या बाहेर जाणारे गुरांच्या वाहनांना कोणतेही अधिकृत संरक्षण दिले जात नाही. पिकअप वाहनमध्ये दोन ते तीन गुरांची वाहतूक होत असतांना अशा वाहनांना अडवून मारहाण करण्याचा, पैसे हिसकवून घेण्याचा प्रकार सध्या वाढला आहे. हा त्रास थांबविण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा व पोलिसांच्या मदतीने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

एखाद्या शेतकर्‍याच्या घरी लग्न, अंत्यविधी असे कार्य असेल तर शेतकरी वृध्द बैलांना विक्रीसाठी बाजारात आणतो. त्याला फक्त पैशांची गरज असते त्यामुळे जनावरे कोण खरेदी करते हे गरजवंताला पाहण्याची आवश्यकता नाही. परवानाधारक व्यापारी हे जनावरांची खरेदी करतात असे जाणकार शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले.

धुळे मार्केट कमिटीत गुरे व्यापार बंद करुन वरखेडी रोड भागात गुरे खरदी-विक्रीचा व्यापार सुरु केला जाईल. असा इशाराही शेतकर्‍यांनी दिला आहे.

कोरोनाचा विसर

धुळे बाजार समितीत मंगळवारी जनावरांचा बाजार भरतो. आज या बाजारात लाखोंची उलाढाल झाली. परंतू शेतकर्‍यांना कोरोनाचा विसर पडलेला दिसून आला. एकाही शेतकर्‍याने चेहर्‍यावर मास्क लावलेला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सचाही फज्जा या बाजारात उडालेला दिसून आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com