खेळाडू कुणाल घरटे मृत्यू प्रकरणी वीज कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिवसेनेची मागणी, घरटे परिवाराला आर्थिक मदत द्या, कुमारनगरातील विद्युत वाहिन्या बदलण्यात याव्यात
खेळाडू कुणाल घरटे मृत्यू प्रकरणी वीज कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

धुळे dhule । प्रतिनिधी

आंतर विद्यापीठ (Inter University) खेळाडू कुणाल घरटे (Kunal Gharte) याच्या मृत्यूस (death)कारणीभूत ठरलेल्या विद्युत वितरण कंपनी (Electricity Distribution Company) विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Crime of culpable homicide) दाखल करुन आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेने (Shiv Sena) केली आहे.

शहरातील कुमारनगर भागात आर/4/10 येथे रहिवासी प्रभाकर घरटे हे वास्तव्यास आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी सायंकाळी आपल्या घरासमोर विद्युत रोषणाई करतांना कुणाल प्रभाकर घरटे हा जयहिंद महाविद्यालयाचा विद्यार्थी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा बास्केटबॉल व फ्लोअर बॉलचा राष्ट्रीय खेळाडू याचा इलेक्ट्रीक पोलचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. कुणाल हा उत्कृष्ट खेळाडू होता. त्याने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली येथे नेतृत्व केले होते.

कुमारनगर हा भाग दाट वस्तीचा असून विद्युत वितरण कंपनीचा विद्युत तारा तसेच इलेक्ट्रीक पोल या भागातील अत्यंत खराब झाले असून तारा या लोंबकळणार्‍या अवस्थतेत आहेत. इलेक्ट्रील पोलमध्ये करंट उतरणे ही बाब या ठिकाणी नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे नागरीकांना आपले प्राणमुठीत घेऊन वावरावे लागते. स्थानिक रहिवाशांनी वारंवार निवेदने देऊन देखील विद्युत वितरण कंपनीने या भागात कुठल्याही प्रकारच्या दुरुस्तीचे काम केलेले नाही. विद्युत वितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे नाहक एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला आहे.

कुणाल हा प्रभाकर घरटे यांचा एकुलता एक मुलगा असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. कुणालच्या मृत्यूस संपूर्णत: विद्युत वितरण कंपनी जबाबदार असून त्यांच्या विरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन या ठिकाणी पंचनामा करुन मृत कुणाल याच्या परिवारास तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

निवेदनावर सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, हिलाल माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, जिल्हा संघटक भगवान करनकाळ, माजी आ.प्रा.शरद पाटील, महानगरप्रमुख धीरज पाटील, डॉ.सुशील महाजन, शहर संघटक राजेश पटवारी, देविदास लोणारी, विधानसभा संघटक ललित माळी, शहर समन्वयक नितीन शिरसाठ, गुलाब माळी, भरत मोरे, माजी जिल्हा प्रमुख भूपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, माजी महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, चंद्रकांत गुरव, प्रफुल्ल पाटील, महिला संघटीका हेमा हेमाडे, डॉ.जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, नगरसेविका सौ.ज्योत्स्ना पाटील, संदीप सूर्यवंशी, पुरुषोत्तम जाधव, रवि माळी, विनोद जगताप, सुनिल पाटील, रामदास कानकाटे, जवाहर पाटील, उपमहानगरप्रमुख शेखर वाघ, हा.रफिक पठाण, मच्छिंद्र निकम, संजय जवराज, प्रविण साळवे, संदीप चव्हाण, नंदलाल फुलपगारे, शरद गोसावी, भटू गवळी, आबा भडागे, पंकज भारस्कर, हेमंत बागुल, महादू गवळी, प्रकाश शिंदे, कुणाल कानकाटे, संदीप चौधरी, विकास शिंगाडे, छोटू माळी, एजाज हाजी, सुनिल चौधरी, काळू गावडे, विभाग प्रमुख कैलास मराठे, पिंटू चौधरी, अक्षय पाटील, रोहित धाकड, पिनू सूर्यवंशी, किरण पवार, दिनेश पाटील, रविंद्र बिलाडे, आबा हरळ, मुरलीधर जाधव, शत्रुघ्न तावडे, सचिन बडगुजर, संजय जगताप, भरत चौधरी, सागर निकम, नंदू उचाळे, दिपक मोरे, शुभम मतकर, निलेश वाघमोडे, कपिल लिंगायत, किरण भुरे, गायत्री लगड, कुंदा मराठे, प्रतीभा सोनवणे आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com