लाचेची मागणी भोवली, धुळे वनपरिक्षेत्राच वनपाल अटकेत

धुळे एसीबीची कारवाई, गुन्हा दाखल
लाचेची मागणी भोवली, धुळे वनपरिक्षेत्राच वनपाल अटकेत

धुळे । Dhule । प्रतिनिधी

माल वाहतुकीचे वाहन (Freight vehicles) सोडून देण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी (Demand for bribe) करणार्‍या धुळे वनपरिक्षेत्राच्या वनपाल (forester of Dhule forest reserve) सुनिल पाटील (Sunil Patil) यास एसीबीच्या पथकाने अटक (ACB team arrested) केली आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराचे माल वाहतुकीचे (Freight vehicles) पिकअप वाहन आहे. त्यांचा मुलगा या वाहनाने माल वाहतुकीचा व्यवसाय करतो. तो देवपूर दत्तमंदिर येथील कॉलनीतील रस्ता रुंदीकरणासाठी (road widening) मनपा (Municipal Corporation) मार्फतीने अडथळा निर्माण करणारी तोडलेल्या झाडांची लाकडे (wood of the broken trees) वाहनात भरुन धुळे येथील पारोळा चौफुलीकडुन धुळे शहरात घेवुन येत होता. त्यादरम्यान कॉटन मार्केट जवळ वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी (Forest Department staff) वाहन अडवुन धुळे येथील कार्यालयात जमा केले होते.

त्यानंतर तक्रारदार यांनी धुळे येथील वन विभागाच्या कार्यालयात (Forest Department Offices)जावुन त्याचे जमा असलेले वाहन सोडविण्यासाठी वनपाल सुनिल आधार पाटील (वय 57) यांची भेट घेतली. तेव्हा वनपाल पाटील यांनी वाहन सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी (Demand for bribe) केली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली.

तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता वनपाल सुनिल पाटील यांनी तक्रारदाराकडे 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु वनपाल पाटील यास तक्रारदाराबाबत शंका आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारण्यास टाळाटाळ केली. पडताळणीवरुन वनपाल सुनिल पाटील यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी (Demand for bribe) केल्याचे निष्पन्न होत असल्याने त्यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (Prevention of Corruption Act) सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यास अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, संतोष पावरा, सुधीर मोरे, व जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com