
धुळे । dhule । प्रतिनिधी
शहरातील देवपूर भागातील एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेकडे (headmistress) शिक्षकाने शरीर सुखाची (body pleasure) मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षकावर (teacher) देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चाळीसागाव रोडवरील हजार खोली परिसरात राहणार्या 43 वर्षीय मुख्याध्यापिकेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या देवपूरातील प्राथमिक शाळेत कार्यरत असून शाळेतील शिक्षक अन्सारी अबुजर मक्सुद अहमद (रा. कबीर गंज, वडजाई रोड,धुळे) याने त्यांच्याकडे वारंवार मागे लागून शरीरसुखाची मागणी करून धमकी दिली. कारण नसतांना मुख्याध्यापिकेच्या पतीला शिवीगाळ करीत धमकी दिली. म्हणून शिक्षक अन्सारीवर भादंवि 354 (अ), 354 (ड), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक आर.एन. जाधव या करीत आहेत.