शिरपूर तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा

शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी; भाजपाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
शिरपूर तालुक्यात सरसकट ओला 
दुष्काळ जाहीर  करा

शिरपूर/बोराडी । Shirpur / Boradi प्रतिनिधी/वार्ताहर

शिरपूर तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ (Wet drought) जाहीर करून शेतकर्‍यांना (farmers) नुकसान भरपाई (Indemnity) मिळावी, अशी मागणी भाजपातर्फे (BJP) करण्यात आली आहे. तसे निवेदन आज आ. काशिराम पावरा,(Kashiram Pavara) जि.प. अध्यक्ष डॉ.तुषार रंधे,(Z.P. Chairman Dr. Tushar Randhe,) भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी व भाजपा पदाधिकार्‍यांंच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांना दिले.

माजीमंत्री आ. अमरिशभाई पटेल यांनी गेल्या तीन दिवसांपूर्वी धुळे व नंदुरबार जिल्हाधिकार्‍यांना निवेदन पाठविले होते. त्यानंतर आज भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. शिरपूर तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी तालुक्यातील गंभीर परिस्थिती लक्षात आणून देऊन निवेदन देण्यात आले. त्यानुसार योग्य तो अहवाल शासनाला पाठवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, संचालक नरेंद्र पाटील, शिरपूर शेतकरी साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, व्हाईस चेअरमन दिलीपभाई पटेल, साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, रमण पावरा, जगन टेलर पावरा, जे.टी. पाटील आदी उपस्थित होते.

शिरपूर तालुक्यात तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके, फळपिके, शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी बांधवांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन शेत जमिनीत पाणी साचले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेती क्षेत्रात सततच्या पावसामुळे पाणी थांबल्याने पिके मुळासकट नष्ट झाले असून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात कोरडवाहू, बागायती, वार्षिक बागायती पिकांना तसेच पशुधन, गोठा व इतर मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावी. तसेच संपूर्ण वर्षाचे विज बिल व पीक कर्ज माफ करावे, अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

Related Stories

No stories found.