अत्याचारामुळे मुकबधीर मुलगी गरोदर; नराधमावर गुन्हा

बाम्हणेतील संतापजनक घटना
अत्याचारामुळे मुकबधीर मुलगी गरोदर; नराधमावर गुन्हा

दोंडाईचा Dondaicha । दि.7 । श.प्र

शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे Bamhane येथे अल्पवयीन मुकबधीर मुलीवर लैंगिक अत्याचार Sexual abuse of a deaf and dumb girl करत तिला गरोदर केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात नराधमावर दोंडाईचा पोलिसात Dondaicha police गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा शोध त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

पिडीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही बाम्हणे येथील रहिवासी आहे. तिचे वडील मजुरी करतात. पिडीता जन्मापासूनच मुकबधीर आहे. तिला काहीही समजत नसल्याने तिच्या अज्ञानाचा अज्ञात इसमाने गैरफायदा घेतला.

तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केले. दि. 3 ऑगस्ट रोजी पिडीतेच्या पोटात दुखत असल्याने कुटुंबियांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकेला घरी बोलाविले. तिने तपासणी करून ती गरोदर असल्याची शंका व्यक्त केली.

तसेच दुसर्‍या दिवशी तिला निमगुळ प्राथमिक आरोग्य केंद्र, दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालय व हिरे वैद्यकीय महाविलयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पिडीता ही गरोदर असल्याचे स्पष्ट केल्या नंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून दोंडाईचा पोलिसात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनि संतोष लोले करीत आहेत.

Related Stories

No stories found.