पांझरा नदीपात्रात मृत अर्भक आढळलेे

पांझरा नदीपात्रात मृत अर्भक आढळलेे

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील पांझरा नदीपात्रात (Panjra river basin) पुरुष जातीचे अर्भक (Male infants die) मृत अवस्थेत आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. शहरातील पांझरा नदीवर (Panjra river basin) कालिका माता मंदिरलगत असलेल्या फरशीपुलावरुन जात असताना एका व्यक्तीला नदीतील पाण्यात अर्भकाचा मृतदेह (infants die) दिसला. त्याने त्वरीत याबाबत शहर पोलिसांना कळविले.

त्यानंतर शहर पोलिसांचे (police) पथक लागलीच घटनास्थळी दाखल झाले. अर्भकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. मृतदेहाच्या शेजारीच एक टोपली देखील होती. पोलिसांनी नदीतील पाण्यात उतरून अर्भक ताब्यात घेतले. हे अर्भक पुरुष जातीचे असून ते कोणाचे आहे? नदीत का फेकले? याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com