शेंदवड, मोहगाव पर्यटन स्थळाला विटभट्टीचा धोका

शेत जमिनीतील मातीची होतेय विक्री; निसर्गप्रेमींमधून कारवाईची मागणी
शेंदवड, मोहगाव पर्यटन स्थळाला विटभट्टीचा धोका

पिंपळनेर Pimpalner। वार्ताहर

साक्री तालुक्यातील शेंदवड, मोहगाव या निसर्गरम्य पर्यटन स्थळाला (Scenic tourist destination) विटभट्टीमुळे (Vitbhatti) धोका निर्माण झाला आहे. तर या विटभट्टीसाठी आदिवासी बांधवांच्या (Tribal brothers) शेत जमिनीतील मातीची विक्री केली जात असल्यामुळे या भागातील विटभट्टीवर बंदी (Captive) घालण्यात यावी, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.

पांझरा नदीचे उगमस्थान शेंदवड, मोहगाव, मांजरी, बारीपाडा ही गावे सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेली गावे आहेत. या ठिकाणी जंगल व दाट झाडीमुळे येथील निसर्ग सौंदर्य तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून हा भाग ओळखला जातो. नव्हे तर आदिवासी भागातील दाट जंगलामुळे जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी पर्यटक भ्रमंतीसाठी येत असतात. शेंदवड, मोहगाव येथे चार कोटी रुपये खर्च करून पर्यटन स्थळाची कामे करण्यात आली आहेत. मात्र या निसर्गरम्य वातावरणात काहींनी विटा भट्टींचाचा सपाटा लावला असून त्यामुळे येथील जंगल व निसर्गरम्य वातावरणास धोका निर्माण झाला आहे. विटभट्टीचा होणारा धूर, त्यात वापरले जाणारे केमीकल त्यामुळे आदिवासी पश्चिम पट्टयात हवामानातही बदल होण्याचे संकेत निर्माण होत आहेत. तसेच या भागातील शेतकर्‍यांना पैशाचे आमिष देऊन यांच्या शेतातील काळी कसदार जमिनीतील माती विक्री होत असल्याचे समोर येत आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या जमिनीसह येथील जंगल व पर्यटन स्थळ धोक्यात आले आहे. या ठिकाणी राजस्थानवरून आलेला एक इसम यांनी या भागात विटा व त्यांचा कारखाना सुरू केल्याचे समजते. सदर इसमास महसूल विभागाकडून परवानगी मिळतेच कशी अशीही चर्चा सध्या सुरू आहे. या आदिवासी निसर्गरम्य भागात वातावरण दूषित होईल, असे कोणत्याही विटाभट्टी अथवा निसर्गाला धोका पोहोचेल, अशा व्यवसायांना परवानगी देऊ नये, अशी तक्रार येथील निसर्गप्रेमी मंडळीने केली आहे.

हा विटभट्टीचा व्यवसाय सुरु राहिल्यास येथील वातावरणाबरोबर शेत जमिनीतील मातीचे उत्खनन सुरु होऊन येथील काळी कसदार व चांगली शेती नष्ट होईल. भविष्यात शेतकरीही नष्ट होतील.तरी या भागातील विटभट्टया त्वरित बंद कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.