एकाच दुकानात तिसर्‍यांदा डल्ला

एकाच दुकानात तिसर्‍यांदा डल्ला

दोंडाईचा । Dondaicha । श.प्र.

शहरात चोरीचे सत्र (Theft sessions) सुरूच आहे. काल रात्री चोरट्यांनी स्टेशन रोडवरील दुकान (Shop) तिसर्‍यांदा फोडले. (Broke) आता 17 हजारांची तांब्याची तार (Copper wire) लंपास केली आहे. दरम्यान चोरीच्या वाढत्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील घरफोड्यांचा तपास (Investigation) देखील अद्याप लागलेला नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुर निघत आहे.

स्टेशन भागातील पारख हॉस्पिटल समोर मोहन सोमवंशी यांचे पाण्याच्या मोटार बांधणीचे दुकान आहे. या दुकानात गेल्या तीन ते चार महिन्यात तिसर्‍यांदा चोरी झाली आहे. चोरट्यांनी काल रात्री दुकानावरील पत्रा कापून आत प्रवेश केला. एकुण 17 रुपये किंमतीची मोटार बांधणीसाठी लागणारी तांब्याची तार चोरून नेली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलीस प्रशासनाने वेळीस चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com