दोंडाईचा नगरपरिषदेचे पर्यावरणदूत सायकलिस्ट राजन मोरे

माझी वसुंधरा अभियानअंतर्गत नियुक्ती
दोंडाईचा नगरपरिषदेचे पर्यावरणदूत सायकलिस्ट राजन मोरे

दोंडाईचा । श. प्र. Dondaicha

येथील वरवाडे (Municipal Council) नगरपरिषदेतर्फे सायकलिस्ट (Cyclist) राजेंद्र गोविंदराव मोरे उर्फ (राजन मोरे) यांची नगरपरिषदेच्या पर्यावरण दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राजन मोरे हे स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे राऊळ दौलतसिंहजी मल्टिपर्पज हायस्कूल व ज्यू कॉलेज येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे, ते आपल्या दैनंदिन जीवनात सायकल वापर करतात ते दररोज 20 ते 25 किमी व सुटीच्या दिवशी 50 किमी सायकल चालवतात त्यांनी सुमारे 14 हजार किमी अंतर सायकल प्रवास केला आहे.

शेगाव, शिवनेरी किल्ला, छत्रपती संभाजी महाराज समाधी तुळापूर, आळंदी, कोटमगाव, धुळे, नंदूरबार, शिरपुर, जयनगर व दोंडाईचा शहर परिसर सायकलवर फिरून सायकल विषयी जनजागृती त्यांनी केली आहे. देखना है कल... तो चलाव सायकल, सायकल चालवा.. प्रदुर्षण वाचवा, असा नारा देत, इंधन वाचवा, पर्यावरणाचे जतन करा असा सल्ला देत पर्यावरणाबाबत केलेल्या जनजागृती बद्दल त्यांची माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेतर्फे मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी पर्यावरण दूत म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, आरोग्य निरिक्षक शरद महाजन, बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत, संतोष माणिक, उद्यान पर्यवेक्षक महेंद्र शिंदे, शीलाकांत मिश्रा आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.