घरात सुरू होता बनावट दारूचा कारखाना : पोलिसांच्या धाडीत झाला उद्धवस्त

घरात सुरू होता बनावट दारूचा कारखाना : पोलिसांच्या धाडीत झाला उद्धवस्त

शिरपूर । Shirpur । प्रतिनिधी

बोराडी येथे घरातच (house) सुरू असलेला बनावट दारूचा कारखाना (Counterfeit liquor factory) पोलीसांनी (police) उद्ध्वस्त (destroyed) केला. या कारवाईत स्पिरिट साठ्यासह तयार विविध ब्रँडची बनावट दारूसाठा जप्त करण्यात आला व एकास ताब्यात घेण्यात आले.

घरात सुरू होता बनावट दारूचा कारखाना : पोलिसांच्या धाडीत झाला उद्धवस्त
चितवी जि.प.गटाची पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार!
घरात सुरू होता बनावट दारूचा कारखाना : पोलिसांच्या धाडीत झाला उद्धवस्त
चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा
घरात सुरू होता बनावट दारूचा कारखाना : पोलिसांच्या धाडीत झाला उद्धवस्त
जाणून घ्या जैन तीर्थकरांच्या जीवनातील कल्याणकारी पंचकल्याणक

तालुक्यातील बोराडी येथे एक व्यक्ती स्पिरिटपासून (spirits) विविध ब्रॅण्डची बनावट दारू (Fake liquor) बनवून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. या माहितीवरून पथकाने मध्यरात्री बोराडी गावात रामा सखाराम पावरा यांच्या झोपडी वजा घरावर छापा टाकला असता त्या घरात स्पिरीटपासून विविध ब्रॅण्डची (various brands) तयार बनावट दारू बाटल्यामध्ये भरतांना आढळून आल्याने त्यास ताब्यात (possession) घेतले.

घटना स्थळावरून पथकाने 35 लिटर स्पिरिट, बनावट दारू तयार करण्यासाठी सुगंधित लिक्विड, प्लास्टिक खाली बाटल्या, बुच, लेबल असे एकूण 31 हजार 250 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संशयितास अटक करण्यात आली.

याप्रकरणी पोना आरिफ पठाण यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रामा सखाराम पावरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय भिकाजी पाटील हे करीत आहे.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,शिरपुर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पीएसआय भिकाजी पाटील,पोहेकॉ संजय धनगर,पोना भूषण चौधरी,चालक पोकॉ,इसरार फारुकी,संतोष पाटील यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com