पिंपळनेरला जिजाऊ ब्रिगेडचे राज्यव्यापी महाअधिवेशन

पिंपळनेरला जिजाऊ ब्रिगेडचे राज्यव्यापी महाअधिवेशन

पिंपळनेर - dhule

जिल्ह्यातील (Sakri taluka) साक्री तालुक्यातील पिंपळनेर (Pimpalner) येथे दि.४ आणि ५ जूनला जिजाऊ ब्रिगेडचे (Jijau Brigade) पहिले राज्यव्यापी ग्रामीण महाअधिवेशन होणार आहे. त्यात विविध विचारमंथन, शोभायात्रा, महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, दिग्गजांचे व्याख्यान होणार आहे.

या अधिवेशनामुळे पिंपळनेरचे नाव राज्यभर जाणार असल्याने तालुक्यातील महिलांनी कामाला लागावे व अधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन अधिवेशन संयोजिका व साक्री जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष भारती भदाणे (Jijau Brigade Taluka President Bharti Bhadane) यांनी केले.

दरम्यान ४ जूनला जिल्ह्यातील जनतेला खास सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दुपारी ४ वाजता शहरातील राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणातुन शोभायात्रा निघेल.

पिंपळनेर आणि परिसरासह राज्यभरातून आलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिला, तरुणी भगव्या साड्या नेसून व डोक्यावर भगवा फेटा परिधान करत या शोभायात्रेत सहभागी होतील. शोभायात्रेत जिजाऊ रथ व पालखी, ग्रंथदिंडी यासह शिवकालीन शस्त्रकला, विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले जाणार आहेत. शोभायात्रा मार्गावर विविध संस्थांकडून रांगोळ्या काढल्या जाणार आहेत. मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होऊन अधिवेशन स्थळी दमंडकेश्वर लॉन्सवर शोभायात्रेचा समारोप होणार आहे.

रात्री ७ वाजता विविध लोककलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम राज्यभरातील विविध जिल्ह्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या विविध शाखांमार्फत महिलांनी आयोजित केलेला आहे. रविवारी ५ जूनला सकाळी ८ वाजता (aurangabad) औरंगाबाद जिजाऊ ब्रिगेडतर्फे महिलांचा प्रसिद्ध शाहिरी जलसा कार्यक्रम आयोजित केला आहे.

सकाळी १० वाजता उदघाटन सत्र सुरु होईल. त्यानंतर महिलांना मार्गदर्शनपर व्याख्यानात "ग्रामीण अर्थशास्त्र आज आणि उद्या" या विषयांतर्गत महिलांसाठी बचतगटांसह,उद्योजक व्यावसाय करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

दुसऱ्या सत्रात अंधश्रद्धा, अनिष्ट कालबाह्य रूढीपरंपरा टाळण्यासाठी वर्तमान युगात महिलांनी कसे आचरण करावे यासंदर्भात "शिवधर्मातील महिलांचे स्थान" या विषयांतर्गत विविध तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

सायंकाळच्या सत्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना जिजाऊ रत्न, जिजाऊ गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाईल. समारोपाच्या सत्रात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष ॲड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह शिवधर्म सांसद सदस्य तथा माजी आमदार रेखाताई खेडेकर, मराठा सेवा संघ प्रदेशाध्यक्ष इंजि. विजय घोगरे, कार्याध्यक्ष प्रा.अर्जुन तनपुरे, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, प्रतिइतिहासकार इंजी.चंद्रशेखर शिखरे, प्रवक्ते गंगाधर बनबरे, संपादक श्रीमंत माने यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

जिजाऊ ब्रिगेडच्या महाअधिवेशनाची तयारी जोरात सुरू असून (Maratha Seva Sangh) मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड पदाधिकाऱ्यांच्या स्थानिक पातळीवर विविध समित्या तयार करण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com