मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात बांधकाम सुपरवायझरने घेतला गळफास

मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात बांधकाम सुपरवायझरने घेतला गळफास

मालपूर - वार्ताहर dhule

मालपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे (Primary Health Center) नवीन वास्तुचे बांधकाम चालु आहे. तेथे सुपरवायझर म्हणुन कामावर असलेला. दिलीप वसंत पाडवी (वय ४५) रा.वरपाडा ता.तळोदा (taloda) याने (Suicide) गळफास घेवुन आत्महत्या केली.

तो नुकताच आपल्या गावाकडुन आल्याची माहिती मिळत असून त्याचे आत्महत्येचे खरे कारण समजु शकले नाही. त्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात जुन्या खोलीत घराच्या छताला गळफास घेतल्याची वार्ता गावात पसरली. तेव्हा आरोग्यकेंद्राच्या कर्मचारी व पोलीस पाटील बापु धनगर यांनी सदरघटना कळवली. दोंडाईचा (police) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. व शवविच्छदनासाठी दोंडाईचा रुग्णालयात पाठविण्यात आले.

Related Stories

No stories found.