महागाईविरोधात काँग्रेसचा ऐल्गार

धुळ्यात आ.कुणाल पाटलांच्या नेतृत्वात आंदोलन
महागाईविरोधात काँग्रेसचा ऐल्गार

धुळे । Dhule प्रतिनिधी

काँग्रेस पक्ष (Congress party) नेहमीच सामान्य माणसाचा आवाज बुलंद करीत आला असून मोदी सरकारने (Modi Govt) वाढवलेल्या जीएसटीमुळे (Increased GST) देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारने वाढवलेली महागाई आणि दडपशाही (Inflation and repression) विरोधात (against) जनतेने रस्त्यावर उतरावे (People should take to the streets), असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील (State Congress Working President MLA. Kunal Patil) यांनी आज धुळ्यात झालेल्या काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनात केले.

माजी मंत्री ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्यूमाईन क्लबजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आ.कुणाल पाटील यांनी केले. केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जीएसटीमुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे. अग्निपथ योजनेमुळे युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

महागाईविरोधात काँग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. देश कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. जीएसटी वाढवून गोरगरिबांच्या खिशातील पैसा उद्योगपतींच्या खिशात घालण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. त्यामुळे यापुढे महागाई आणि केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाही विरोधात जनतेने रस्त्यावर उतरावे असे, आवाहनही आ.कुणाल पाटील यांनी केले. जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी भाजपने अवलंबलेल्या चुकीच्या धोरणांवर घणाघाती प्रहार केला.

आंदोलनात माजी खा.बापू चौरे, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, साबीर खान, खरेदी-विक्रीचे चेअरमन लहू पाटील, भगवान गर्दे, डॉ.एस.टी.पाटील, रीतेश पाटील, साक्री तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, बाजीराव पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, एन.डी.पाटील, डॉ.अनिल भामरे, मुजफ्फर हुसैन, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल, साहेबराव खैरनार, डॉ.दत्ता परदेशी, अ‍ॅड.बी.डी. पाटील, किर्तीमंत कौठळकर, सोमनाथ पाटील, अशोक राजपूत, राजेंद्र भदाणे, प्रदीप देसले, बापू खैरनार, किरण नगराळे, मुकुंद कोळवले, रावसाहेब पाटील, भटू महाले, राजीव पाटील, रामेश्वर चत्रे, दिलीप शिंदे, सुनिता साळुंके, पंकज चव्हाण, उमाकांत पाटील, सलमान मिर्झा, सुरेश बैसाणे, अभिमान भोई, मनोहर पाटील, मोहन पाटोळे, तसेच शिंदखेडा येथील प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, आनंदा जावडेकर, माजिद खान पठाण, गोकुळसिंग राजपूत, मनीषा वाघ, माधवराव पाटील, बळीराम राठोड, हसन पठाण, भटू चौधरी, छोटू चौधरी, बानुबाई शिरसाठ, हर्षल साळुंके, हरीष पाटील, सादीक शेख, शकील अहमद, भिला सयाईस यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखयेने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com