काँग्रेसचे अग्नीपथ योजनेला विरोध; धुळे, दोंडाईचात धरणे आंदोलन

काँग्रेसचे अग्नीपथ योजनेला विरोध; धुळे, दोंडाईचात धरणे आंदोलन

धुळे Dhule । प्रतिनिधी

अग्नीपथ योजना (Agneepath Yojana) तत्काळ मागे घ्यावी असा यासाठी धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्या (Taluka Congress Committee) पदाधिकार्‍यांनी धरणे (Dharne Andolan) आंदोलन केले. यावेळी धुळे तहसिलदार (Tehsildar's) यांना निवेदनही (statement) देण्यात आले.

धुळे तालुका काँग्रेस कमिटीतर्फे धुळे तहसिल कार्यालयाशेजारी धरणे आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन पार पडले. यावेळी जिल्हा सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे,पं.स.चे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, सोमनाथ पाटील, खरेदी विक्रीचे संचालक बापू खैरनार,माजी सरपंच उमाकांत पाटील,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस पंकज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. धरणे आंदोलनानंतर धुळे तहसिलदार गायत्री सैंदाणे यांना निवेदन दिले.

या धरणे आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे सचिव डॉ.दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, मनपा विरोधी पक्षनेते साबीर शेख, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, डॉ.अनिल भामरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, पं.स.चे माजी सदस्य पंढरीनाथ पाटील, संतोष पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक बापू खैरनार, कृषीभूषण भिका पाटील, माजी सरपंच धनराज पाटील, कन्हैयालाल पाटील, ज्येष्ठ नेते मुकूंद कोळवले, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, माजी संचालक राजेंद्र भदाणे, हिरामण पाटील, बळीराम राठोड, इंद्रसिंग गिरासे, संतोष राजपूत, बानुबाई शिरसाठ, शिवाजी अहिरे आदी सहभागी झाले होते.

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन

अग्नीपथ योजनेला विरोध करण्यासाठी धुळे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देवून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

या येाजनेचा निषेध नोंदविला. या प्रसंगी शहर जिल्हा अध्यक्ष प्रा.शरद पाटील, प्रदेश सचिव युवराज करनकाळ, सरचिटणीस जसपाल सिसोदीया, रमेश श्रीखंडे, मुझ्झफर हुसेन, सदाशिव पवार, गोपाल देवरे, राजेंद्र तावडे, प्रकाश शर्मा, इलियास अन्सारी,दीपक पाटील, जावेद देशमुख, शोएब अन्सारी, जावेद मल्टी,राजेंद्र खैरनार,भगवान कालेवर,हरीभाऊ अजळकर,भावनाताई गिरासे,सुमनताई मराठे, हरीभाऊ चौधरी, मुकूंदराव कोळवले, जगदिश चव्हाण,अनिता बैसाणे,अस्लम बागवान,बाणूभाई शिरसाठ, साबीर शेख,मच्छिंद्र येरडावकर, नावेद शेख,सलमान मिर्झा,भटू महाले,दिपक छोटू पाटील, विजय बोरसे, कमलेश भामरे आदी उपस्थित होते.

दोंडाईचा येथे काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी शिंदखेडा विधानसभेतील दोंडाईचा येथे काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे परिसर दणाणून गेला. अप्पर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात माजीमंत्री डॉ हेमंत देशमुख, माजी नगराध्यक्ष रविंद्र देशमुख, सुनिल चौधरी, प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, बापु महाजन, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल दादा माणिक, पं.स. सदस्य विशाल देसले, दोंडाईचा शहराध्यक्ष वसंत कोळी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू झालसे, आबा मुंडे, उपसभापती शामकांत पाटील, महेंद्र पाटील, राजु देशमुख,माधव पाटील, कैलास आखाडे, किशोर बागुल, चंद्रकांत शिरसाठ, हुसैन बोहरी, मुन्ना खाटीक, कल्लु पठाण, बापु निकम, नितीन देसले, महेंद्र देसले, खडु देसले, प्रशांत पदमोर, प्रशांत पाटील,वकिल ठाकरे, भागवत परदेशी, रतिलाल पाटील, रामकृष्ण धनगर, किशोर पाटील, हेमराज पाटील, भैय्या माळी, कुलदीप निकम, पवन पाटील, मोना शेहजाब्दिन आदी सहभागी झाले होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com