काँग्रेस हा विचारांनी लढणारा पक्ष - ना. यशोमती ठाकुर

काँग्रेस हा विचारांनी लढणारा पक्ष - ना. यशोमती ठाकुर

धुळे Dhule । प्रतिनिधी

काँग्रेस पक्ष (Congress) हा विचारांनी लढणारा (Fighting with thoughts) आहे. पक्षाची विचारधारा जपून ठेवण्याचे काम कार्यकर्त्यांचे आहे. पक्षासाठी कार्यकर्ता सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा असतो असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री ना.यशोमती ठाकुर (Minister Yashomati Thakur) यांनी केले.

दरम्यान, जिल्हयात काँग्रेसची एक हाती सत्ता येण्यासाठी आ.कुणाल पाटील यांना राज्यात संधी द्यावी म्हणून मी राहूल गांधीकडे आग्रही राहिल असेही आश्वासन मंत्री ठाकूर यांनी दिले.

मंत्री यशोमती ठाकुर या काल जिल्हा दौर्‍यावर आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रोहिदास पाटील हे होते.

पुढे बोलतांना ना. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, देशात, राज्यात आणि गाव पातळीवर वातावरण बदलेले आहे. काँग्रेसला संपविण्याची भाषा करणार्‍यांनी आता काँग्रेसयुक्त भारत पाहण्याची तयारी ठेवावी. भारत आता काँग्रेसयुक्त होत असल्याचे पाहून भाजपा ईडी सारख्या शासकीय यंत्रणांचा वापर करुन दबाव आणण्याचे काम करीत आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता हा विचारांनी लढणारा कार्यकर्ता आहे.

त्यामुळे अशा दबावाला घाबणारा नाही. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्याने देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सामन्य माणूस हैराण झाला आहे. आज संविधानात मनमानी बदल करुन लोकशाही धोक्यात आणण्याचे काम भाजपाचे केंद्रातील सरकार करीत आहे. देशाचा अभिमान, गौरव आणि अमूल्य ठेवा असलेल्या साबरमती आश्रमाच्या जागेवर मॉल बांधून तो नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार भाजपाचे मोदी सरकार करीत आहे.

त्यामुळे देश आणि लोकशाही वाचवायची असेल तर जनतेने आता काँगे्रसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष, आ.कुणाल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार, प्रा.शरद पाटील यांनी प्रास्ताविक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com