भूमिगत गटार व जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण करा

खा.डॉ. सुभाष भामरे यांचे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्देश
भूमिगत गटार व जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण करा

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरातील भूमिगत गटार, (Underground sewers) अक्कलपाडा प्रकल्पावरून सुरू असलेल्या जलवाहिनीचे (Water duct) काम तातडीने पूर्ण (completed) करावे असे निर्देश खा. डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी दिले.

जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक आज जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आली होती. खा. डॉ. सुभाष भामरे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, महापौर प्रदीप कर्पे, खा.डॉ. हीनाताई गावित, आ.काशिराम पावरा, आ.मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महापालिकेचे आयुक्त देवीदास टेकाळे, सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदी उपस्थित होते.

खा.डॉ. भामरे म्हणाले, धुळे जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकर्‍यांना मिळवून द्यावा. धुळे शहरातील भूमिगत गटार, अक्कलपाडा प्रकल्पावरून सुरू असलेल्या जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे. मनरेगा बाबत चर्चेसाठी लवकरच स्वतंत्र बैठकीचे आयोजन करावे, अशाही सूचना खा.डॉ. भामरे यांनी दिल्या.

वीज वितरण कंपनीसह राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत खा.डॉ. गावित, आ.श्री.पावरा, आ.श्रीमती गावित, धुळे पंचायत समितीचे सभापती विजय पाटील, अशासकीय सदस्य वसंत पावरा, संजय जाधव, प्रा. अरविंद जाधव आदींनी सहभाग घेतला. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

योजनेचे कार्यकारी अभियंता ए.एस. पाटील यांनी सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेची माहिती दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

सुलवाडे- जामफळ योजनेला गती द्यावी तत्पूर्वी सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेचा खा. डॉ. भामरे यांनी आढावा घेतला. उपसा सिंचन योजना राष्ट्रीय योजना असून या योजनेला गती द्यावी. प्रलंबित कामे सर्व शासकीय विभागांनी समन्वय साधत पूर्ण करावीत. त्यासाठी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी दरमहा आढावा बैठक घेवून अहवाल सादर करावा.

-खा.डॉ. सुभाष भामरे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com