आयुक्त, कलेक्टरकडे जा, काहीच होणार नाही!

प्रभाग क्र. 16 च्या नगरसेविका योगीता बागुल यांची सत्यसाईबाबा सोसायटीच्या रहिवाशांना अरेरावी, आयुक्तांना निवेदन
आयुक्त, कलेक्टरकडे जा, काहीच होणार नाही!

धुळे Dhule। प्रतिनिधी

शहरातील साक्री रोडवरील प्रभाग क्र. 16 मधील सत्यसाईबाबा सोसायटीत (Satyasai Baba Society) गटारी व रस्त्याच्या कामाबाबत (sewerage and road works) तक्रारी (Complaints) घेवून गेलेल्या रहिवाशांना (Resident) नगरसेविका योगीता बागुल (corporator Yogita Bagul) यांनी आयुक्त, कलेक्टरकडे जा, (Commissioner, go to the collector,) काहीच होणार नाही असे सुनावले. गटारीच्या कामांना सुरुवात केली. गटारीही खोदल्या परंतू अचानक गटारीचे काम बंद केले. त्यामुळे रस्त्यावर पाणी येत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी याबाबत दखल घेण्यात यावी यासाठी आयुक्त देविदास टेकाळे (Commissioner Devidas Tekale) यांना निवेदन देण्यात आले आहे. गटारी व रस्त्यांचे कामे न केल्यास घरपट्टी भरणार नाही असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील साक्री रोडवरील प्रभाग क्र. 16 मधील सत्यसाईबाबा सोसायटी महापालिकेतर्फे नवीन गटारी तयार करण्याचे काम सुरु असतांना अचानक दि. 27 एप्रिल रोजी काम बंद करण्यात आले. अर्धवट खोदकाम करुन काम बंद अवस्थेत आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गटारीचे काम का बंद करण्यात आले? हे समजू शकलेले नाहे. त्यामुळे संबंधित प्रभागातील नगरसेविका योगीता बागुल यांना रहिवाशांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, तुमच्या गल्लीमध्ये अजून रस्ते, गटारी मंजूर नाहीत. सांडपाण्याचा त्रास नागरिकांना होत आहे. गेल्या 20 वर्षांपासून फक्त एकदाच रस्ते झाले आहेत. त्यानंतर नगरसेविका बागुल यांना रहिवाशांनी निवेदन दिले होते. त्यावेळी रस्ते व गटारी दुसर्‍या निधीमधून बनवून देते असे सांगून 26 मे 2022 रोजी गटारींच्या कामाला सुरुवात केली. 50 फूटपर्यंत नाल्या खोदल्या परंतू त्यानंतर अचानक त्यांनी काम बंद केले. त्याबाबत विचारले असता तुमच्या येथे गटार बनू शकत नाही. ट्युब लेव्हल लागत नाही असे सांगितले. परंतू काम सुरु करण्यापुर्वी तेथील सर्व्हे केला जातो. गटारीसाठी खोदकाम करुन नंतर काम बंद केले. त्यामुळे नागरिकांनी नगरसेविकेकडे गटार करायची नव्हती तर खोदकाम का केले? अशी तक्रार केली. त्यावर मंजूर नसलेली गटार करता येणार नाही असे नगरसेविका बागुल यांनी रहिवाशांना सांगितले. असे निवेदनात म्हटले आहे.

या प्रभागातील रस्ते पुर्ण खराब झाले आहेत. गल्लीतील सांडपाणी जाण्यासाठी जागा नाही. शोचखड्डे पुर्णपणे भरले गेले आहे. ते पाणी रस्त्यावरुन वाहते त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. पावसाळा आता सुरु होईल. खोदकाम केल्यामुळे त्यात पाणी साचेल. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढेल. याबाबत संबंधित नगरसेविका बागूल यांच्याकडे नागरिकांनी तक्रारर केली असता आयुक्त, कलेक्टरकडे जा काहीच होणार नाही अशी अरेरावी त्या करतात अशी तक्रार नागरिकांनी निवेदनात दिली आहे. तत्कालीन महापौर प्रदीप कर्पे यांनी गल्लीत येवून पाहणी केली. त्यावेळी त्यांनी रस्ते व गटारी दलित योजनेमधून तयार करुन द्यावेत असे सांगितले होते.परंतू त्याची दखल घेण्यात आलेली नाही. प्रभाग क्र. 16 मध्ये रस्ते व गटारी झाले नाहीत तर नागरिक कर भरणार नाहीत असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

निवेदनावर ए.सी.गिरी, सौ. भिकुबाई गढरी, सौ. निलिमा शिंदे, आर.सी. शिंदे, एम.बी. गिरासे, कृष्णा खैरनार, एच.एस. परदेशी, श्री. कासारे, सुमनबाई सुर्यवंशी, व्ही.आर. गिरी, सुभाष सोनार, भावना सोनार, एस.सी.शिंदे, संगिता प्रवीण, प्रवीण सैंदाणे, आशा कुलकर्णी, पुजाबाई सुर्यवंशी, चित्रा कासारे यांच्यासह 36 रहिवाशांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com