आ. जयकुमार रावल म्हणाले...गुरुवारपर्यंत निर्णय न घेतल्यास..

आ. जयकुमार रावल म्हणाले...गुरुवारपर्यंत निर्णय न घेतल्यास..

दोंडाईचा Dondaicha । प्रतिनिधी

एसटी कर्मचार्‍यांच्या (ST staff) संपाला (Strike) आ. जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांनी पाठिंबा (Support) देवून ते स्वत: आंदोलनात सहभागी झाले. सरकारने (government) आंदोलनाची दखल (Notice the movement) घेतली नाही. तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आ. रावल यांनी दिला आहे.

धुळे बसस्थानक येथे जाऊन आ. जयकुमार रावल यांनी आंदोलनात सहभागी घेवून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे अहमद शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना आ. रावल म्हणाले की, ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे कर्मचारी आत्महत्या करीत असतांना या सरकारला संवेदना नाहीत, एवढे दिवस आंदोलन सुरू आहे. तरी देखील सरकारने दखल घेतलेली नाही.

या आंदोलनाला भारतीय जनता पक्षातर्फे पाठिंबा दिला असून गुरुवारपर्यंत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आ. रावल यांनी दिला. यावेळी शेकडो एसटीचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com