वसुंधरेच्या संरक्षण आणि संवर्धनाचा सामूहिक संकल्प

निसर्ग मित्र समितीतर्फे वृक्ष माता वंगारी मथाई यांची जयंती साजरी; पुरस्कार वितरण
वसुंधरेच्या संरक्षण आणि संवर्धनाचा सामूहिक संकल्प

धुळे Dhule। प्रतिनिधी

वृक्षमाता वंगारी मथाई जयंती (Vrikshamata Wangari Mathai Jayanti) दिनानिमित्त निसर्ग मित्र समितीतर्फे (Nature Friends Committee) आयोजित पुरस्कार वितरण सोहळयामध्ये सहभागी निसर्गप्रेमींनी वसुंधरेच्या संरक्षण (Earth conservation) आणि संवर्धनाचा सामूहिक संकल्प (Collective resolution) केला.

निसर्ग मित्र समितीतर्फे वृक्ष माता वंगारी मथाई जयंती दिना निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा (Prize distribution) कार्यक्रम धुळे पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.चे उपसभापती विद्याधर पाटील हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा वनसंरक्षक माणिकराव भोसले, जि.पच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, पं.सचे गटविकास अधिकारी आर. डी. वाघ, निसर्ग मित्र समितीच्या महिला अध्यक्षा मनीषा डियालानी, समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी.बी. पाटील, प्रदेश सचिव संतोष पाटील, किशोर डीयलानी आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच पर्यावरणासाठी उल्लेखनीय काम करणार्‍यांचा देखील सत्कार करण्यात आला.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार (Deputy Chief Executive Officer Pradeep Pawar) म्हणाले की, वसुंधरेचे संरक्षण आणि संवर्धन करायचे असेल तर पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नी या पंचतत्वांवर काम करावे लागेल. त्याचाच एक भाग म्हणून शासनाने माझी वसुंधरा (My Vasundhara) हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. निसर्ग मित्र समितीचे सुरू असलेले काम हे निश्चितच वसुंधरेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पोषक असे आहे.

शासनाचा कार्यक्रम पुढे नेण्याचे काम समितीचे पदाधिकारी -कार्यकर्ते आणि निसर्गप्रेमी करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. माझी वसुंधरा (My Vasundhara) अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी सर्व घटकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज बनली आहे असे श्री.पवार यांनी सांगितले. वनसंरक्षक श्री.भोसले यांनी विभागामार्फत सुरु असलेल्या कार्यक्रमांची माहिती देऊन सांघिक प्रयत्नातून निश्चितपणे यश मिळू शकते. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज पाहिजे, असे सांगितले. गटविकास अधिकारी श्री.वाघ यांनी वसुंधरेच्या संवर्धनासाठी काम करणार्‍या सत्कार मूर्तीच्या कामाची प्रशंसा करीत इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.

वृक्षमाता डॉ.वंगारी मथाई (Vrikshamata Wangari Mathai Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात माझी वसुंधरा अभियानात निसर्ग मित्र सक्रिय सहभाग घेणार असून डॉ.वंगारी मथाई यांनी संपूर्ण जगाला दिलेला निसर्ग संवर्धनाचा -Nature Conservation= वसा पूर्णत्वाला नेण्याचा संकल्प (Resolutio) निसर्ग मित्रांनी केला आहे. सर्व महाविद्यालये, कनिष्ठ विद्यालय, प्राथमिक, माध्यमिक शाळांत यासोबतच समाजामध्ये प्रभावी प्रबोधन करून वृक्ष बँक (Tree bank) या वर्षी करण्याचा निर्धार देखील उपस्थित निसर्ग मित्रांनी केला आहे. याप्रसंगी उपस्थितांना जल शपथ देखील देण्यात आली. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. प्रास्ताविक डी.बी.पाटील यांनी केले. तर आभार संजीवनी गांगुर्डे यांनी मानले.

Related Stories

No stories found.