धुळ्यानजीक दगडी कोळशाच्या ट्रकला भीषण आग

धुळ्यानजीक दगडी कोळशाच्या ट्रकला भीषण आग

धुळे । dhule । प्रतिनिधी

शहरानजीक मुंबई-आग्रा महार्गावर वरखेडी रोडवर दगडी कोळशाने भरलेल्या ट्रकचे (Coal truck) टायर फुटल्याने ट्रकला अचानक आग (fire) लागली. अग्नीशमन दलाने आग नियंत्रणात आणली. मात्र बाराचाकी या ट्रकची काही टायर्स, बॉडी, कॅबीनमधील सीट जळून खाक झाले. अग्नीशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वरखेडी रोडवरील कचरा डेपोपुढे कर्नाटक राज्याकडून गुजरात राज्यातील कच्छकडे चालक हितेश कुमार हा ट्रक (क्र. जी.जे.12/बी. वाय. 9394) ने जात होता. मात्र वरखेडी रोडवरील कचरा डेपोजवळ या ट्रकला आग लागली. या आगीत ट्रकमधील दगडी कोळशाने पेट घेतला. ठिणगीचे रूपांतर भीषण आगीत झाले.

धुराचे लोट दिसताच चालकासह परिसरातील नागरिकांनी अग्नीशमन दलास कळविले. काही वेळातच अग्नीशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग नियंत्रणात आणली. मात्र आग सर्वत्र पसरली. या आगीत ट्रकच्या टायरसह कॅबिनमधील सिट व इतर साहित्याचे जळून नुकसान झाले. अग्नीशमन दलामुळे पुढील अनर्थ मात्र टळला. या आगीच्या घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलिसांसह आझादनगर पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवित वाहतूक सुरळीत केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com