सी.एन.देसले यांचा जामीन अर्ज फेटाळला

ग.स.बँकेतील चार कोटींचे गैरव्यवहार प्रकरण
धुळे
धुळेशहर

धुळे । Dhule । प्रतिनिधी

धुळे - नंदुरबार जिल्हा सरकरी नोकरांची सहकारी बँक (Dhule - Nandurbar District Government Servants' Co-operative Bank) अर्थात ग.स. बँकेत सुमारे चार कोटी रुपयांचा (four crore rupees) गैरव्यवहार (Misappropriation) केल्याचा आरोप तत्कालीन चेअरमन चंद्रकांत देसले (Chairman Chandrakant Desale) यांच्यावर आहे. या प्रकरणी सध्या ते कोठडीत असून आज न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून (bail application rejected) लावला.

ग.स.बँकेत सन 2012 ते 2014 या कालावधीतील संचालक मंडळाच्या मदतीने तत्कालीन चेअरमन देसले यांनी सुमारे सहा हजार सभासदांकडून कर्ज रकमेला सुरक्षा देण्याच्या नावाखाली विमा काढण्यासाठी प्रत्येकी साडेतीन हजार रुपये वळती करुन घेतले. मात्र प्रत्यक्षात विमा काढलाच नसल्याची तक्रार बँक आंदोलनाचे प्रमुख राजेंद्र शिंत्रे यांनी पुराव्यानिशी नाशिक विभागीय सह निबंधकांकडे केली.

सुमारे चार कोटी रुपयांचा अपहार केल्याचेही त्यांनी नमुद केले. याप्रकरणी चौकशी होवून गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी चंद्रकांत देसले पावणे दोन वर्षांपासून फरार होते. अखेर 8 ऑगस्ट रोजी त्यांना शहर पोलिसांनी अटक केली.

सध्या ते 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज 16 ऑगस्टला त्यांच्या वतीने जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. मात्र मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही.कुलकर्णी यांनी हा अर्ज फेटाळून लावला. यात तक्रार शिंत्रे यांच्यावतीने अ‍ॅड. नितीन रायते यांनी काम पाहिले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com