आर्वी शिवारात महामार्गावर तरूणाला सिनेस्टाईल मारहाण

आर्वी शिवारात महामार्गावर तरूणाला सिनेस्टाईल मारहाण

धुळे - प्रतिनिधी dhule

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) तालुक्यातील आर्वी शिवारात दुचाकीस्वार तरूणाला कारमधील सहा जणांनी सिनेस्टाईल (Cinestyle) मारहाण केली. त्यात तो जखमी झाला. या घटनेत त्याचा मोबाईल व 25 हजारांची रोकडही गेली.

आर्वी शिवारात महामार्गावर तरूणाला सिनेस्टाईल मारहाण
प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार...

याप्रकरणी तालुका पोलिसात (police) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. करण ज्ञानेश्‍वर पाटील (वय 19 रा. धाडरे ता.धुळे) असे जखमी तरूणाचे नाव आहे. तो बुधवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने आर्वीकडून धुळ्याकडे येत होता. त्यादरम्यान आर्वीतील भवानी माता मंदिरजवळ मागून कारमधून येणार्‍या एकाने त्याला चालत्या गाडीवर डोक्यात दांडके मारले.

आर्वी शिवारात महामार्गावर तरूणाला सिनेस्टाईल मारहाण
प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार...

त्यामुळे करण याने गाडी थांबविली. त्यानंतर कारमधील अनिल लोणारीसह (रा.नकाणे रोड, देवपूर) सहा जणांनी खाली उतरून त्यापैकी दोन जणांनी त्याला हॉकीस्टीकने मारहाण केली.

आर्वी शिवारात महामार्गावर तरूणाला सिनेस्टाईल मारहाण
प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार...

तुझ्यासह तुझा भाऊ बंटी पाटील अशा दोघांचा मर्डर करू, असे बोलून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याची दुचाकी घेवून पळून गेले. तेव्हा करण याला त्याचा मोबाईल व खिशातील 20 ते 25 हजारांची रोकड देखील गेल्याचे लक्षात आले. पुढील तपास पीएसआय सागर काळे करीत आहेत.

आर्वी शिवारात महामार्गावर तरूणाला सिनेस्टाईल मारहाण
प्राजक्ताचा मराठमोळा साज शृंगार...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com