पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास सिनेस्टाईल अटक

धुळे शहर पोलिसांची कारवाई
पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्यास सिनेस्टाईल अटक

धुळे-प्रतिनिधी dhule

शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पिस्टलसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एकाला शहर (police) पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पडकले. त्याच्याकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतूस असा 26 हजारांचा हस्तगत करण्यात आला. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली.

शहरातील ज्योती टॉकीजच्या बाजुला असलेल्या विजय व्यायमशाळेच्या समोर रोडवर आदित खिमशंकर भट्ट (वय २२ रा. मनमान जिन, पाण्याच्या टाकी समोर, धुळे) हा अंगात काळया रंगाचा टी-शर्ट (हुडी) व राखाडी रंगाची पॅन्ट परीधान केलेला इसम हा गावटी बनावटीचा पिस्टल व जिंवत काडतुस सामान्य लोकांनामध्ये दहशत किंवा काही तरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उददेशाने जवळ बाळगुन असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यानी पथकाला कारवाईबाबत आदेश दिले.

पथकाने घटनास्थळी आदित खिमशंकर भट्ट यास घेराव करुन ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला डाव्या बाजुस एक पिस्टल व पॅन्टच्या उजव्या खिशात दोन जिवंत काडतुस असा एकुण २६ हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ व्हि.आर.भामरे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तसेच शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोहेकॉ विलास भामरे, मुक्तार मन्सुरी, निलेश पोतदार, अविनाश कराड, तुषार मोरे, शाकीर शेख, प्रसाद वाघ यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com