सावधान.. गौण खनिजांची अवैध वाहतुक केली तर..

  सावधान.. गौण खनिजांची अवैध वाहतुक केली तर..
संग्रहीत छायाचित्र

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

धुळे व साक्री (Dhule and Sakri) तालुक्यात गौण खनिजाची (secondary minerals) अवैध वाहतूक (Illegal transport) करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई (Punitive action) सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे (Sub-Divisional Officer Trupti Dhodmise) यांनी दिली आहे.

वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी न्याहळोद व कुसुंबा येथील सरपंच व ग्रामसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत.

नकाणे, ता. धुळे येथील पंकज श्रावण महाले यांचे वाहन क्रमांक (मिनी डंपर) एमएच 28, एबी 7634 हे वाहन कुसुंबा येथील पांझरा नदी पात्रालगत सरकारी गट क्रमांक 761 क्षेत्र 2 हेक्टर 19 आर येथे असलेल्या वाळूच्या दोन ढिगांच्या मध्ये उभे होते. यावरून वाळूच्या अनधिकृत वाहतुकीबाबत दंडाच्या स्वरुपात एक लाख रुपये दंड तहसीलदार, धुळे यांनी ठोठावला होता. तो कायम ठेवण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी दिला आहे. तसेच गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी वाहने यापूर्वी महसूल विभागाने पकडली होती. त्यावरून संबंधितांनी शंभर रुपयांच्या बंधपत्र लिहून दिले होते. या बंधपत्राचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपविभागीय अधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी गणेश हिरामण पाटील, हिरामण दशरथ पाटील रा. बोरीस, ता. धुळे यांना साडेचार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सदरचा दंड न भरल्यास संबंधितांच्या मालकीचे क्षेत्र बोरीस येथील गट क्रमांक 708/2अ/3 क्षेत्र एक हेक्टर 26 आर मालमत्तेवर बोजा चढविण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे. याशिवाय बंधपत्राचे उल्लंघन केल्याने समाधान परमेश्वर पाटील, रा. कुंडाणे (वरखेडी, वाहन क्रमांक एमएच 41, डी 1439), ता. धुळे यांना साडेचार लाख रुपये, बलराज लालचंद पाटील (अहिरे) रा. कुंडाणे (वार, वाहन क्रमांक एमएच 18, एए 7585), ता. जि. धुळे यांना सहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

धुळे ग्रामीणच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांनी कारवाई केली. त्यात वाल्मिक महानोर, उत्तम महानोर, मिलिंद मुडावदकर यांच्या मालकीच्या जापी, ता. धुळे शिवारातील गट क्रमांक 240/2 मध्ये वाळूचा ढिग आढळून आला. त्याचा पंचनामा जापीच्या तलाठ्यांनी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार संबंधितांचा खुलासा मागविण्यात आला होता. वाल्मिक महानोर यांचा खुलासा त्यांचा मुलगा भूषण याच्या मालकीचे वाहन मिनी ट्रक क्रमांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी वाळू या गौण खनिजाची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरोधात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा खुलासा अमान्य करण्यात आला, तर उत्तम महानोर व मिलिंद मुडावदकर यांनी खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळे तहसीलदार श्रीमती सैंदाणे यांनी या तिघांना आठ ब्रास वाळूच्या संदर्भात एकूण दोन लाख 4 हजार रुपये दंड ठोठावला आहे. अशाच प्रकारचा दंड कुसुंबा शिवारातील गट क्रमांक 697/अ या पंडित झिपा परदेशी व मधुकर झिपा परदेशी यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर आढळून आलेल्या चार ब्रास वाळू साठा आढळल्याप्रकरणी करण्यात आला आहे. त्यांना एकूण एक लाख दोन हजार रुपये दंड असेही आदेश दिले आहेत.

कडक कारवाई करण्याचे धोरण धुळे उपविभागात गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍यांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महसूल विभागाची पथके गठित करण्यात आली आहेत. आवश्यक तेथे पोलिस दलाची मदत घेवून गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण राबविण्यात येईल.
-तृप्ती धोडमिसे, सहाय्यक जिल्हाधिकारी, धुळे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com