भरती प्रक्रियेत उमेदवाराची हुशारी पकडली, दोघांवर गुन्हा

भरती प्रक्रियेत उमेदवाराची हुशारी पकडली, दोघांवर गुन्हा

धुळे । Dhule। प्रतिनिधी

शहरातील एसआरपीएफच्या मैदानावर सुरू असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलच्या भरती (Maharashtra Security Force) प्रक्रियेत अधिकार्‍यांनी (authorities) एका उमेदवाराची हुशारी (genius of a candidate) पकडली (Caught). दुसर्‍याच्याच नावावर उभे राहणार्‍या उमेदवारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एसआरपीएफचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक साबीर कबीर शेख (वय 42) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार शहरातील एसआरपीएफ बल गट क्र. 6 येथील मैदानावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यात मनोज रमेश गवळी (वय 25) व रोहीत रतीलाल पाटील (रा. नंदाळे ता.धुळे) या दोघांनी संगणमत करून आपली हुशारी दाखविण्याचा प्रयत्न केला.

मात्र अधिकार्‍यांच्या तपासणीत त्यांचे बिंग फुटले. काल सकाळी सात वाजेच्या सुमारास मनोज गवळी हा रोहीत पाटील यांच्या नावाचे कागदपत्रे घेवून त्यांच्या जागेवर भरती प्रक्रियेसाठी उभा राहीला होता. अधिकार्‍यांनी तपासणी केली तेव्हा हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी दोघांवर धुळे तालुका पोलिसात भादंवि कलम 419, 177, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com