फसवणूकप्रकरणी नागपूर नागरी बँकेच्या मॅनेजरसह दोघांवर गुन्हा

फसवणूकप्रकरणी नागपूर नागरी बँकेच्या मॅनेजरसह दोघांवर गुन्हा

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

कागदपत्रांचा गैरवापर (Misuse of documents) व खोटी सही (false signature) करून फर्मला (firm) 15 लाख रूपयांचे कर्ज मंजुर (Loan approval) करून फसवणूक (Fraud) केल्या प्रकरणी नागपूर नागरी सहकारी बँकेच्या (Nagpur Urban Cooperative Bank) मॅनेजरसह (manager) दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

याबाबत भगवान बाबुराव दळवी (वय 41 रा. समर्थ नगर, उत्कर्ष कॉलनी जवळ, साक्री रोड, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांच्या व्यवसायासाठी गरूड बागेतील नागपूर नागरी सहकारी बँकेतून 15 लाख रूपयांचे वाढीव सीसी कर्ज मंजुरीसाठी या बँकेचे मॅनेजर चंद्रशेखर मुद्रीस यांनी दळवी यांचे महिंदळे शिवारातील समर्थ नगरातील राहत्या घराचे कागदपत्रे व कोरे स्टॅम्प पेपर घेतले.

परंतू ही मालमत्ता दळवी यांच्या कर्जास गहाण न ठेवता त्या कागदपत्रांचा गैरवापर केला. खोटी सही करून कागदपत्रांचे बनावटीकरण करून प्रविण सुदाम सोनार यांच्या साई इलेक्ट्रॉनिक्स या फर्मला 15 लाख रूपयांचे कर्ज मंजुर करून दळवी यांची फसवणूक केली.

हा प्रकार दि. 22 मार्च 2018 रोजी घडला. याप्रकरणी मॅनेजर चंद्रशेखर मुद्रीस व प्रविण सोनार (रा. हरीओम कॉलनी, शांती नगरसमोर, मिल परिसर, धुळे) या दोघांवर भादंवि कलम 420, 409, 467, 468, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com