
धुळे ।dhule। प्रतिनिधी
भरधाव कारने (car) दुचाकीला (bike) दिलेल्या धडकेत पिता ठार (Father killed) तर पुत्र जखमी (Son injured) झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सांगवी गावानजीक झाला. याप्रकरणी कार चालकाविरुध्द शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश जगन्नाथ शिंपी असे मयत पित्याचे तर रुपेश प्रकाश शिंपी (वय 30 रा. पाटीलवाडा, शिरपूर) असे जखमी पुत्राचे नाव आहे. दोघे दि.5 मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास एमएच 18/6685 क्रमांकाच्या दुचाकीने मुंबई-आग्रा महामार्गाने शिरपूरकडून सेंधवाकडे जात होते.
त्यादरम्यान त्यांना सांगवी गावाच्या पुढे भरधाव एमएच 05/सीए-3110 क्रमांकाच्या भरधाव कारने दुचाकीला मागून जबर धडक दिली. त्यात दुचाकीवर मागे बसलेले प्रकाश शिंपी हे जागीच ठार झाले. तर रुपेश शिंपी हा जखमी झाला.
याप्रकरणी रुपेश शिंपी याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारवरील अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.