महापालिकेतर्फे मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम

महापालिकेतर्फे मोकाट जनावरे पकडण्याची मोहिम

धुळे Dhule । प्रतिनिधी

शहरात मोकट जनावराचा प्रश्न (question of free animals) लक्षात घेवून महापालिकेतर्फे (Municipal Corporation) धडक कार्यवाही (Campaign to catch) सुरू करण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी दि. 30 जुलैपासून सुरू करण्यात आलेली आहे. सदरची कार्यवाही आयुक्त देविदास टेकाळे (Commissioner Devidas Tekale) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

यापुर्वी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार आयुक्त देविदास टेकाळे यांनी याबाबत आदेश देवून याबाबतची कार्यवाही सक्षमतेने राबविण्यात येत आहे. मोकाट जनावराच्या मालकांना यापुर्वीच महापालिकेतर्फे 24 तासाची नोटीस देण्यात आलेली असून गुरे ताब्यात घेण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. यात 120 गुरे मालकांचा समावेश आहे.

दि.30 जुलै पासून प्रत्यक्षात मोकाट गुरे पकडण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी सुमारे 60 कर्मचारी शहराच्या विविध भागात नियुक्त करण्यात आलेले आहे. काल झालेल्या कार्यवाहीत एकूण 15 मोकाट गायी पकडून खान्देश गोशाळा येथे जमा करण्यात आलेल्या आहेत. या खान्देश गोशाळेचे अध्यक्ष पवन पोददार यांनी सहकार्य केलेले आहे. यापैकी चार गायी मालकांवर प्रत्येकी 460 रूपये दंड आकारणी करून गुरे ताब्यात देण्यात आलेली आहे.

रविवार रोजी ही सदरची कार्यवाही करण्यात आली आहे. मोकाट गुरे मालकांनी 15 दिवसाच्या आत गुरे ताब्यात न घेतल्यास सदर गुरे जप्त करून व आवश्यक ती कायदेशीर पुर्तता करून गोशाळेच्या सुपूर्त करण्यात येणार आहे. तसेच संबंधित गुरे मालकांवर अधिनियमातील तरतूदीनुसार गुन्हे व आर्थिक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच संबंधित भागातील स्वच्छता निरिक्षक यांना त्यांच्या भागात मोकाट जनवारे आढळल्यास संबंधित स्वच्छता निरिक्षकांवर दंडात्मक कार्यवाहीचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com