दुकानात पर्स घेण्यासाठी आले, 25 ग्रॅमची सोनसाखळी खेचून पळाले

दुकानात पर्स घेण्यासाठी आले, 25 ग्रॅमची सोनसाखळी खेचून पळाले

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरातील देवपूर भागातील बॅगल्स दुकानात (Bagels shop) पर्स विकत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन भामट्यांनी दुकानदार महिलेच्या गळ्यातील 25 ग्रॅमची सोनसाखळी (gold chain) खेचून पळ काढला, काल रात्री ही घटना घडली. याबाबत प्रज्ञा योगेश कासार (वय 30 रा.प्लॉट नं. 3 गणराया सरगर कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी देवपूर पोलिसात (police) तक्रार दिली आहे.

त्यानुसार, त्यांचे घराला लागूनच बॅगल्सचे दुकान आहे. काल दि.23 रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास दोन अनोळखी इसम पर्स विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानात आले. त्यांना पर्स दाखवित असतांना त्यातील एकाने प्रज्ञा यांच्या गळयातील 25 ग्रॅमची सोन्याची चैन जबरीने हिसकावली. त्यांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवर बसून धुमस्टाईलने पसार झाले. दोघा अनोळखी इसमांवर पश्‍चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीएसआय इंदवे पुढील तपास करीत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com